ETV Bharat / state

Naresh Goyal : नरेश गोयल विरोधात ईडीचे आरोपपत्र दाखल

कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयलसह इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय. गोयल यांना ईडीनं 1 सप्टेंबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली होती. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

Naresh Goyal
Naresh Goyal
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 9:53 PM IST

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मंगळवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयलसह इतर पाच जणांविरुद्ध 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. कॅनरा बँकेचं 538 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी नरेश गोयल यांना ईडीनं 1 सप्टेंबर रोजी अटक केली होती.

अटक बेकायदेशीर असल्याचा : ऑगस्ट 2023 च्या शेवटच्या आठवड्यात ईडीकडून चौकशीसाठी गोयल यांना नोटीस बजावली होती. परंतु त्यांनी चौकशी करता सहकार्य केलं नसल्याचं म्हणत अंमलबजावणी संचलनालयानं त्यांना अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए न्यायालयानं त्यांना तुरुंगाच टाकलं होतं.

उच्च न्यायालयाकडून अद्यापही दिलासा नाही : उच्च न्यायालयानं या प्रकरणी गोयल यांना अद्यापही दिलासा दिलेला नाहीये. नरेश गोयल यांच्या वकिलांनी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा न्यायालयात केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या विविध दाखल्यांच्या आधार देत उच्च न्यायालयानं त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. रजिस्ट्री विभागाकडे विशेष पीएमएलए न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

बँकेला 538 कोटींचा लावला चुना : या प्रकरणात, कफ परेड येथील कॅनरा बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयाकडून कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तक्रारीनुसार, हा गुन्हा 1 एप्रिल 2009 ते 5 जून 2019 दरम्यान घडला होता. जेट एअरवेजचे खाते 5 जून 2019 रोजी बँकेनं दिवाळखोर म्हणून घोषित केलं होतं. त्यानुसार बँकेला 538 कोटी 62 लाख रुपयाचं नुकसान झालंय. आर्थिक व्यवहारांच्या तपासात बँकेनं दिलेला निधी अन्य ठिकाणी वळवल्याचं उघड झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानं आरोपीला मदत केल्याचं तक्रारीत व्यक्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी दिल्ली सीबीआयनं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयलसह चार कंपन्यांविरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय.

गोयल कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी : ईडीच्या तपासानुसार नरेश गोयल यांनी सुमारे 6000 कोटी रुपयांच्या कर्ज बुडवलंय. फॉरेन्सिक अकाउंटंट परीक्षेतील कन्सल्टन्सी तसंच प्रोफेशनल फीच्या नावावर सुमारे 1 हजार 152 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. तसंच गोयल यांनी सुमारे 40 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. जेट एअरवेजचे कर्ज फेडण्यासाठी 2,547 कोटी 83 लाखांचा वापर करण्यात आला. गेल्या काही वर्षांत नरेश गोयल यांच्या कुटुंबीयांना 9 कोटी 46 लाख रुपये देण्यात आले. त्यात गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल, मुलगी नम्रता गोयल, मुलगा निवान गोयल यांचा समावेश आहे. 2011-12 ते 2018-19 या कालावधीत कंपनीकडून विविध कारणे देत ही रक्कम पाठवण्यात आली आहे. त्यामुळं ईडी काही परदेशी कंपन्यांची, तसंच गोयल कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी करत आहे.

हेही वाचा -

  1. No Relief to Naresh Goyal: नरेश गोयल यांना आजही दिलासा नाही, कारण ईडीनं केलाय 'हा' युक्तीवाद
  2. जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्या घरावर ईडीची छापेमारी
  3. 'जेट एअरवेज'चे मालक नरेश गोयल यांच्या घरांवरही 'ईडी'चे छापे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.