मुंबई : रत्नागिरीतील दापोली या ठिकाणी साई रिसॉर्ट हे पर्यावरणाच्या नियमाला डावलून उभारण्यात आले. तसेच या हॉटेलमधले पाणी थेट नदीमध्ये सोडले जाते. नदी प्रदूषित केली जाते. तसेच या संदर्भात अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय अंमलबजावणी संचलनालयाला होता. म्हणून त्यांनी अनिल परब यांच्या संदर्भात खटला दाखल केलेला आहे. परंतु अनिल परब यांचा आणि सदानंद कदम यांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे देखील ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी मागच्या महिन्यात सदानंद कदम यांना अटक केलेली होती, आज त्यांच्यावर अखेर आरोप पत्र निश्चित केले गेले.
साई रिसॉर्ट बेकायदा बांधकाम : सदानंद कदम हे एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत. त्यांचा त्या भागामध्ये राजकीय प्रभाव आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या राजकीय प्रभावातून आर्थिक गैरव्यवहार केला. त्यांच्यामुळेच साई रिसॉर्ट बेकायदा बांधकाम केले गेले. तसेच याबाबतचा जो आर्थिक व्यवहार झालेला आहे. त्याचे अनेक पुरावे सक्त वसुली संचलनालयाकडे आहे, असे त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. याबाबत सातत्याने सत्र न्यायालयामध्ये त्यांनी मनी लाँड्रीग संदर्भातील विशेष न्यायालयात सातत्याने बाजू मांडली होती.
न्यायालयाच्या समक्ष आरोप निश्चिती : सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एमजी देशपांडे यांच्या एकल खंडापिठासमोर सत्य वसुली संचलनालहाने सदानंद कदम यांच्यावरील आरोप आज वाचून दाखवले. त्यानंतर न्यायालयाच्या समक्ष आरोप निश्चिती करण्यात आली. दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर अनिल परब यांनी सीआरझेड, नागरी विकास क्षेत्रामध्ये बांधलेले साई रिसॉर्ट अनधिकृत आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी 20 साक्षीदारांचा त्यांच्या विरोधात जबाब आहे.