ETV Bharat / state

राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, राज्यपालांचे भाषण निवडणूक आयोगाकडून प्रमाणित - राज्यपाल

दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्यात, कशा प्रकारच्या उपाययोजना शासन करत आहे. याचा उल्लेख राज्यपाल विद्यासागर राव यांच्या भाषणात होईल.

राज्यपाल सी. विद्यासागर राव
author img

By

Published : Apr 30, 2019, 10:45 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा म्हणजेच चौथा टप्पा पार पडल्यानंतर आता १ मे रोजी राज्यात ५९ वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. राजधानी मुंबईत शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा होणार असून यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मुख्य भाषण होणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे या भाषणावर मर्यादा येणार आहे. राज्यपालांचे भाषण निवडणूक आयोगाने प्रमाणित केले असून हेच भाषण राज्यपाल करणार आहेत.

राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, राज्यपालांचे भाषण निवडणूक आयोगाकडून प्रमाणित

दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्यात, कशा प्रकारच्या उपाययोजना शासन करत आहे. याचा उल्लेख राज्यपाल विद्यासागर राव यांच्या भाषणात होईल. मात्र आचारसंहिता असल्याने शासनाच्या नव्या काही उपाययोजना अथवा यशाबाबद राज्यपाल आपल्या भाषणात उल्लेख करणे टाळतील, असे चित्र आहे. शासनाच्या विविध योजना आणि त्याचे परिणाम याबाबतचे भाष्य राज्यपालांच्या भाषणात होत असते, मात्र आता आचारसंहितेमुळे भाषणावर मर्यादा आल्या आहेत.

सकाळी आठ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार असून यावेळी राज्य पोलीस विभागाकडून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना मानवंदना दिली जाईल. तसेच राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मराठी भाषिकांच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र रथ यावेळी होणाऱ्या संचालनालयात सहभागी होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव यु.पी.एस. मदन, मंत्रिमंडळातील सहकारी त्याचबरोबर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Intro:राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह , राज्यपालांचे भाषण निवडणूक आयोगाकडून प्रमाणित

मुंबई ३०

महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा चौथा टप्पा पार पडल्या नंतर आता १ मे रोजी राज्यात ५९ वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे .राजधानी मुंबईत शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा होणार असून यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे मुख्य भाषण होणार आहे . आचारसंहितेमुळे या भाषणावर मर्यादा येणार आहे . राज्यपालांचे भाषण निवडणूक आयोगाने प्रमाणित केले असून हेच भाषण राज्यपाल करणार आहेत .

दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्यात कश्या प्रकारच्या उपाययोजना शासन करत आहे . याचा उल्लेख राज्यपाल विद्यासागर राव यांच्या भाषणात होईल . मात्र आचारसंहिता असल्याने शासनाच्या नव्या काही उपाययोजना अथवा उपलब्धी बाबत राज्यपाल आपल्या भाषणात उल्लेख करणे टाळतील असे चित्र आहे . शासनाच्या विविध योजना आणि त्याचे परिणाम याबाबतचे भाष्य राज्यपालांच्या भाषणात होत असते . मात्र आता भाषणावर मर्यादा आल्या आहेत .

सकाळी आठ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार असून यावेळी राज्य पोलीस विभागाकडून राज्यपाल चे विद्यासागर राव यांना मानवंदना दिली जाईल .तसेच राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे . मराठी भाषिकांच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र रथ यावेळी होणाऱ्या संचालनालयात सहभागी होणार आहेत . राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह मुख्य सचिव यु पी एस मदन , मंत्रिमंडळातील सहकारी त्याचबरोबर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.