ETV Bharat / state

कोकणात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही, परिवहन मंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात गणोशोत्सवसाठी एसटीने जाणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसली तरी इतर वाहनांनी जाणाऱ्यांना ई पास आवश्यक असणार आहे. जे चाकरमानी कोकणात जातील त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोहोचायचे आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांऐवजी 10 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी करण्यात आला आहे.

आजपासून एसटीचे बुकिंग सुरू
आजपासून एसटीचे बुकिंग सुरू
author img

By

Published : Aug 4, 2020, 4:57 PM IST

मुंबई - कोकणातील गणोशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांबाबतचा गेले कित्येक दिवसांपासून रेंगाळलेला प्रश्न आज अखेर सुटला आहे. आज(मंगळवार) संध्याकाळी 6 वाजल्यापासून एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. तसेच एसटीने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ई पासची आवश्यकता नसणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. गणोशोत्सवसाठी कोकणात एसटीने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची गरज लागणार नाही. पण खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास अनिवार्य असणार आहे. जे चाकरमानी कोकणात जातील त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोहोचायचे आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांऐवजी 10 दिवसांचा होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. 12 ऑगस्टनंतर ज्यांना कोकणात जायचे असेल त्यांनी मागील 48 तासांत कोरोना चाचणी करणे गरजेचे असल्याचे अनिल परब म्हणाले. एसटीने प्रवास करण्यासाठी 22 जणांचा एक ग्रुप असेल. ग्रुप बुकींग केल्यास थेट त्या गावात एसटी जाईल आणि एसटी कुठेही थांबणार नाही.

खासगी बस चालकांनी एसटी भाड्यापेक्षा दीडपटच भाडे घ्यावे. तक्रार झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही खासगी बसचालकांना परब यांनी दिला आहे. 3 हजार एसटी बसेस कोकणात जाण्यासाठी तयार ठेवल्या आहेत. इतरांना गाड्या पाठवायच्या असतील तर, त्यांनी पाठवाव्यात, असे उत्तर त्यांनी मनसेकडून सोडण्यात आलेल्या बसेसवर दिले.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा तिढा सुटणार

जून-जुलैपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराची थकबाकी होती. आज अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 550 कोटी एसटीला देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होतील. हा निर्णय घेतल्याबद्दल अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केलेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.