मुंबई: या फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी एका जणाला आरोपी असल्याचे दाखविण्यात आले आहे. आसिफ अब्दुल हबीब चुनावाला हे व्यवसायाने कंत्राटदार असून ते विलेपार्ले येथे राहतात. सध्या ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत बांधकामाचे खासगी कंत्राटदार म्हणून काम पाहतात. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना दोन खासगी कंपन्यांचे बांधकामाच्या साहित्याचे साडेसात लाख रुपये द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या नावे अडीच आणि पाच लाख रुपयांचे दोन धनादेश आरटीजीएस स्लिप भरून त्यांच्या चुलत भावाला दिले होते. दुसर्या दिवशी त्यांच्या भावाने बँकेत जाऊन ते दोन्ही चेकसह स्लीप बँकेत जमा केले होते. त्यानंतर बँकेकडून त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यांच्या होकारानंतर ही रक्कम संबंधित बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून साडेसात लाख रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त झाला होता. मात्र, त्यातील दोन्ही चेकद्वारे रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाली असल्याचे निदर्शनास आले.
अशाप्रकारे चोरली रक्कम: या प्रकाराबाबत संशयास्पद वाटताच चुनावाला यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांनी चेकसोबत दिलेली आरटीजीएसची स्लिप बदललेली होती. तिथे दुसरी स्लिप असल्याने ती रक्कम संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यामुळे त्यांनी बँक अधिकार्यांकडे तक्रार केली होती. या घटनेनंतर बँक अधिकार्यांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचे आरटीजीएस स्लिप असलेल्या चेकची चोरी करून दुसरी आरटीजीएस स्लिप भरली आणि साडेसात लाख रुपयांचा परस्पर अपहार केला होता.
चोरीचा गुन्हा दाखल: फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर चुनावाला यांनी जुहू पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या एक वर्षांनंतर जुहू पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध जबरी चोरीसह बोगस कागदपत्रांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वॉण्टेड असलेल्या मोहम्मद जावेद पटेल या मुख्य आरोपीस जुहू पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने ही फसवणूक केल्याचे सांगितले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या मित्राचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
एटीएम कार्डची अदलाबदली: अंबाजोगाई एटीएमवर पैसे काढता येत नसल्याने, एटीएम कार्ड अनोळखीच्या हाती सोपविणे एका व्यक्तीस भलतेच अंगलट आले होते. भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून तब्बल 97 हजारांना गंडा घातला. ही घटना 29 जानेवारी, 2023 रोजी घडली. दिवाकर भगवान दळवे (वय 65 वर्षे, रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) असे फसवणूक झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
असा लागला छडा: बीड जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक केलेल्या 2 लाख 68 हजार रुपयांचा बीड सायबर पोलिसांनी त्याचा छडा लावून हे पैसे परत केले होते. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील सुनिता प्रवीण जाधव, बीड शहरातील शाहूनगर भागातील लक्ष्मण गुलाबराव वंजारे, तर नरेश बाबुराव शिंदे (रा. चंपावती नगर बीड), चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे (रा. नेकनूर ता. बीड), आशुतोष बाळासाहेब घोडके (रा. बीड) या सर्वांची ऑनलाईन फसवणूक होऊन बँक खात्यातून परस्पर 2 लाख 68 हजार रुपये खात्यातून परस्पर चोरी गेल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. तक्रारदारांनी सायबर पोलिसांना झालेला प्रकार सांगितला आणि आठ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. ज्या व्यक्तींनी तक्रार दिली होती त्या सर्वांना बोलावून त्यांची रक्कम त्यांना मिळवून दिली.
सायबर पोलिसांचे आवाहन: सायबर पोलीस ठाणे बीड हे सर्व नागरिकांना असे आवाहन करत आहे की, कोणीही अनोळखी लोकांशी फोन एसएमएस सोशल मीडियावरून देवाणघेवाण पैशाचे व्यवहार करू नयेत. व्यापार करत असताना त्याची संपूर्ण खात्री करावी. हिंदी भाषिक लोकांचे येणारे कॉल हे फसवणाऱ्या लोकांचे असू शकतात किंवा कोड पाठवू नका. कोणतेही अनोळखी एप, लिंक खात्री केल्याशिवाय डाउनलोड करू नका, असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे.
हेही वाचा: Vande Bharat Train : 'वंदे भारत एक्सप्रेस'वर प्रवासी नाराज; 'हे' आहे कारण