ETV Bharat / state

मुंबईत डंपरच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू - pedestrians Accident News

बावला मशिदीजवळील मोनो रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. अपघातात दोन्ही पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

Accident
डंपरच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू
author img

By

Published : Feb 26, 2020, 7:44 AM IST

मुंबई - बावला मशिदच्या समोर असलेल्या मोनो रेल्वे स्थानकाच्या खाली एका भरधाव डंपरने दोन पादचाऱ्यांना उडवल्याची घटना घडली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

डंपरच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू

हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा

या घटनेत पायी चालत जाणाऱ्या संजय सखाराम पवार (वय 59) आणि आणखी एका 50 वर्षीय या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.