मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची छोट्या पक्षांनी कोंडी केली आहे. त्यामुळे महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल ३ वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली. मात्र, त्यानंतरही महाआघाडीची घोषणा होऊ न शकल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. आमची मित्रपक्षांशी चर्चा सुरु असून लवकरच जागा वाटपाचा घोळ मिटेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाआडीची घोषणा केली जाणार होती. परंतु, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर आणि शेकाप आधी छोट्या पक्षांनी जमवून न घेतल्यामुळे ही आघाडी अजून पूर्ण झाली नसल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आमची पक्षांसोबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर निर्णय होईल. त्यानंतर आम्ही आघाडीतील जागा आणि पक्षांची माहिती देऊ असेही चव्हाण म्हणाले.
हेही वाचा - आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण
हेही वाचा - 'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'
महाआघाडीची घोषणा करण्यासाठी तब्बल ३ वेळा पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आल्यानंतरही महाआघडीची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. दुपारी २ वाजेपर्यंत आघाडीसोबत अद्याप न येण्याची भूमिका ठेवलेल्या समाजवादी पक्षाला समजावण्यात आघाडीला यश आले आहे. समाजवादी पक्षाला ३ जागा देत आघाडीने आपल्यात सामील करून घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.