ETV Bharat / state

'सरकारच्या बेजबाबदारपणामुळे क्वारंटाईन सेंटरमध्ये चुकीच्या घटना घडताहेत' - ram kadam latest news

सरकारच्या बेजबाबदारीपणामुळे, अयोग्य नियोजन आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याने हे घडत आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवण मिळत नाही, अशा अनेक गैरसोयी व समस्या आहेत. याला हेच सरकार जबाबदार आहे, असा आरोपही कदम यांनी केला.

भाजप नेते राम कदम
भाजप नेते राम कदम
author img

By

Published : Jul 18, 2020, 2:50 PM IST

मुंबई - मुंबईसह शेजारीच असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल शहरांत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोना संशयित असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. अशाचप्रकारे पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे घडली आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.

पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये जी घटना घडली आहे ती दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकार काय करत आहे. सरकारचा बेजबाबदारीपणामुळे, अयोग्य नियोजन आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याने हे घडत आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवण नाही मिळत अशा अनेक गैरसोयी व समस्या आहेत. याला हेच सरकार जबाबदार आहे, असा आरोपही कदम यांनी केला.

काय आहे घटना?

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी झगडत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. यानुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयित आणि हाय रिस्क रुग्णांना कोन येथील इंडिया बुल्स येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार घडला. कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या २५ वर्षीय युवकाने सेंटरमध्ये नव्याने दाखल झालेल्या ४० वर्षीय महिलेला डॉक्टर असल्याचे भासवले. तिने अंगदुखी होत असल्याचे सांगताच मालिश देण्याच्या बहाण्याने युवकाने महिलेवर बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने पनवेल तालुका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असून आरोपी युवक हा कोरोनाबाधित असल्याने त्यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.