ETV Bharat / state

मुंबईत सध्या रिमझिम पाऊस; एनडीआरएफसह अन्य यंत्रणा सज्ज - मुंबई हवामान अपडेट

दोन दिवसात मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने काल दिला होता. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आपल्या 24 विभागीय कार्यालयांसह अग्निशामक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), नौसेना, कोस्ट गार्ड आदी यंत्रणांना सज्ज ठेवले आहे. मात्र, सध्या मुंबईत काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे.

Mumbai Rain
मुंबई पाऊस
author img

By

Published : Jul 4, 2020, 12:03 PM IST

मुंबई - काल(शुक्रवारी) सकाळी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यानंतर दोन दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला. यामुळे मुंबई महानगरपालिकेने आपल्या 24 विभागीय कार्यालयांसह अग्निशामक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), नौसेना, कोस्ट गार्ड आदी यंत्रणांना सज्ज ठेवले आहे. मात्र, सध्या मुंबईत काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे.

मुंबईत सध्या रिमझिम पाऊस

मुंबईत हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यातच समुद्राला सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती आली. मोठ्या भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचते व आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागीय कार्यालयांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश देण्यात आले. या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रण कक्षांना 'हाय अलर्ट' देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसवण्यात आलेले पाणी उपसा करणारे पंप कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अग्निशामक दल, एनडीआरएफ, नौसेना सज्ज -

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशामक दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रासाठी असलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना त्वरीत मदतीकरिता सज्ज रहाण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. रिमझिम पावसामुळे मुंबईत कुठेही पाणी साचलेले नाही. मुंबईमधील रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.