ETV Bharat / state

Mumbai Airport Gold Smuggling: मुंबईतील विमानतळावर सोने तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस: साडेतीन किलो सोने जप्त, 11 जणांना अटक - मुंबई विमानतळ सोने तस्करी रॅकेट

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.1 कोटी रुपयांचे 3.35 किलो सोने जप्त करून 11 जणांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

मुंबई विमानतळ सोने तस्करी
Mumbai Airport Gold Smuggling
author img

By

Published : May 8, 2023, 8:14 AM IST

मुंबई- महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे. महसूल गुप्त संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी 2.1 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. तर 11 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका संशयित प्रवासी प्रवाशाला डीआरआय अधिकाऱ्यांनी अडवल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. डीआरआय अधिकाऱ्यांनी संशयित प्रवाशाकडून पेस्ट स्वरूपात 3.35 किलो सोने जप्त केले आहे. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, भारतात सोन्याच्या तस्करीत गुंतलेले प्रवासी बँकॉक ते दुबई असा प्रवास करायचे. हे आरोपी तस्करची सोने विमानतळावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना देत असत. विमानतळावरील कर्मचारी हे तस्करीचे सोने विमानतळाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासह विविध ठिकाणी ह असलेल्या पुढील व्यक्तीकडे पोहोचवायचे.

मोठ्या प्रमाणात सुरू होती तस्करी- दिल्लीहून मुंबईला जात असताना सोन्याच्या क्लिअरन्ससाठी विमानतळावर इतरांची भरती करण्यासाठी जबाबदार असलेल्या एका व्यक्तीला डीआरआयने त्यानंतर पकडले. सोने तस्करीसाठी एका व्यक्तीने विमानतळावर काही कर्मचारी नियुक्त केले होते. या आरोपीला दिल्लीहून मुंबईला जाताना अधिकाऱ्याने अटक केली आहे. चौकशीच्या आधारे, डीआरआयने सोने गोळा करणाऱ्या आणि तस्करीच्या कारवायांसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या इतरांनाही पकडले. डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या नवीन पद्धतीचा वापर करून दररोज मोठ्या प्रमाणात सोन्याच्या तस्करीत सुरू होती. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

सोने तस्करीचे प्रमाण वाढले- कोरोनाने देशभरात थैमान घातलेले असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोने तस्करीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, त्यानंतर सोने तस्करीचा आलेख उंचावत गेला आहे. कोरोना काळ संपल्यानंतर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याने महसूल गुप्त संचालनालयाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई विमानतळावर चालू वर्षांत तब्बल ६०४ किलो पेक्षा सोने जप्त करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. तस्करांकडून सोन्याची पेस्ट करून विमानतळ कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

हेही वाचा-

Drugs Peddlers Arrested In Thane: 'मॅफेड्रॉन' अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Builder Bungalow Theft Pune : बिल्डरच्या बंगल्याचे कुलूप तोडून 79 लाखाची चोरी; सेक्युरिटी गार्डचा प्रताप

Minor Girl Raped : मुलीची साडे तीन हजारात विक्री, लॉजवर नेवून बलात्कार; महिलेसह पुरूषावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.