ETV Bharat / state

पायल तडवी प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिष्ठाता डॉ. रमेश भारमलांची संचालक पदी नियुक्ती

अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पायल तडवी प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिष्ठाता डॉ. रमेश भारमलांची संचालक पदी नियुक्ती
author img

By

Published : May 29, 2019, 9:20 PM IST

मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर असलेल्या डॉ. पायल यांनी वरिष्ठांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. तर या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेची केईएम, सायन आणि नायर ही 3 मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयाच्या प्रमुखपदी पालिकेकडून संचालकांची नियुक्ती केली जाते. यासाठी या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांचा विचार केला जातो. संचालक पदावर असलेले डॉ. अविनाश सुपे यांच्या निवृत्तीनंतर नोव्हेंबर 2018 पासून हे पद रिक्त होते. या पदावर प्रभारी म्हणून केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता संचालक पदासाठी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नायर रुग्णालयातील टोपीवाला महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी यांनी नुकतीच आपल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंग आणि जातीवादाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पायलच्या आईने रुग्णालयाकडे त्रासाबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना निलंबित करण्याची मागणी विविध पक्ष आणि संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी रोज आंदोलने होत असताना पालिका प्रशासनाने मात्र त्यांना 3 रुग्णालयाचे प्रमुख असलेल्या संचालक पदी नियुक्त केल्याने पालिका आणि पालिकेबाहेर नवा वाद निर्माण होणार आहे.

आताच नियुक्ती का?

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय) या पदावर करण्यासाठी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने कार्यालयीन आदेश काढले आहेत. त्यावर प्रमुख कर्मचारी अधिकारी, उप आयुक्त (सामान्य प्रशासन), सह आयुक्त (सामान्य प्रशासन), अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या 24 जानेवारी 2019 च्या सह्या आहेत. अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची 25 जानेवारीची सही आहे. तर पालिका आयुक्त अजोय मेहता यांची 12 एप्रिलची सही आहे. आयुक्तांनी भारमल यांच्या नियुक्तीला एप्रिल महिन्यात मान्यता दिली होती. मग गेल्या दिड महिन्यात त्यांची नियुक्ती का करण्यात आली नाही. आता डॉ. पायल आत्महत्या प्रकरण गाजत असतानाच त्यांची नियुक्ती का करण्यात आली? असे प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.

Intro:मुंबई -
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर असलेल्या डॉ. पायल यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Body:मुंबई महानगरपालिकेची केईएम, सायन आणि नायर ही तीन मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयाच्या प्रमुखपदी पालिकेकडून संचालकांची नियुक्ती केली जाते. यासाठी या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांचा विचार केला जातो. संचालक पदावर असलेले डॉ. अविनाश सुपे यांच्या निवृत्तीनंतर नोव्हेंबर २०१८ पासून हे पद रिक्त होते. या पदावर प्रभारी म्हणून केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता संचालक पदासाठी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नायर रुग्णालयातील टोपीवाला महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी यांनी नुकतीच आपल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंग आणि जातीवादाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पायलच्या आईने रुग्णालयाकडे त्रासाबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना निलंबित करण्याची मागणी विविध पक्ष आणि संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी रोज आंदोलने होत असताना पालिका प्रशासनाने मात्र त्यांना तीन रुग्णालयाचे प्रमुख असलेल्या संचालक पदी नियुक्त केल्याने पालिका आणि पालिकेबाहेर नवा वाद निर्माण होणार आहे.

नियुक्ती आताच का ? -
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय) या पदावर करण्यासाठी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने कार्यालयीन आदेश काढण्यात आले आहेत. त्यावर प्रमुख कर्मचारी अधिकारी, उप आयुक्त (सामान्य प्रशासन), सह आयुक्त (सामान्य प्रशासन), अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या २४ जानेवारी २०१९ च्या सह्या आहेत. अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची २५ जानेवारीची सही आहे. तर पालिका आयुक्त अजोय मेहता यांची १२ एप्रिलची सही आहे. आयुक्तांनी भारमल यांच्या नियुक्तीला एप्रिल महिन्यात मान्यता दिली होती मग गेल्या दिड महिन्यात त्यांची नियुक्ती का करण्यात आली नाही. आता डॉ. पायल आत्महत्या प्रकरण गाजत असतानाच त्यांची नियुक्ती का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- डॉ. रमेश भारमल यांचे फोटो Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.