मुंबई - वैद्यकीय विद्यार्थिंनी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पायलने आत्महत्या केली नसून, तिचा खूनच झाला असल्याचा दावा तिच्या वकिलाने केला आहे. पायलच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची माहिती पायलच्या वकिलाने दिली आहे.
यासंदर्भात तपासणीसाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. यासंदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. जाणूनबुजूण पायलची जातीवरुन छेडछाड केली गेल्याचेही वकिलाने सांगितले. पुराव्यासाठी आम्ही न्यायालयाकडे वेळ मागितला असल्याचेही वकिलाने सांगितले. ३१ तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण
रँगिगला कंटाळून डॉ. पायल तडवीने आत्महत्या केली आहे. ती मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय पदव्युत्तरचे शिक्षण घेत होती. ती आदिवासी तडवी समाजाची होती. १ मे २०१८ ला तिला मागासवर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयातील सिनियर असलेल्या डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी तिचा छळ केल्याचा आरोप पायलच्या नातेवाईकांनी केला होता. याप्रकरणी तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून तिघींनाही अटक करण्यात आली आहे.