ETV Bharat / state

या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे - डॉ. कन्हैया कुमार - kanhaiya kumar on CAA NRC

NRC आणि CAA विरोधात जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत सर्व भेद मिटवून एकत्र या. आम्ही भारताचे लोक आहोत. या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे. तीच या आंदोलनाची ओळख आहे. यामुळे 'निकलो बंद मकानो से जंग लढो बेइमानो से' असे आवाहन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी  शुक्रवारी मुंबईत केले.

mumbai
या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे - डॉ. कन्हैया कुमार
author img

By

Published : Jan 25, 2020, 7:14 AM IST

मुंबई - NRC आणि CAA विरोधात जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत सर्व भेद मिटवून एकत्र या. आम्ही भारताचे लोक आहोत. या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे. तीच या आंदोलनाची ओळख आहे. यामुळे 'निकलो बंद मकानो से जंग लढो बेइमानो से' असे आवाहन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी शुक्रवारी मुंबईत केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली. NRC आणि CAA विरोधात आग्रिपाडा येथील वायएमसीए मैदानात आयोजिन कार्यक्रमावेळी त्यांनी हे आवाहन केले.

या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे - डॉ. कन्हैया कुमार

हेही वाचा - केंद्राच्या CAA, NRC विरोधात 'भारत जोडो'ची चळवळ सुरू करा - डॉ. गणेश देवी

या कार्यक्रमावेळी डॉ. कन्हैया कुमार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले की, दर वर्षी पाच लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात, त्यांना डिग्री दाखवून मोदी सरकार नोकरी देणार का? जग फिरून किती गुंतवणूक आणली? असा सवाल करत मोदी शहा यांच्यावर त्यांनी टीका केली. मोदी आणि शहा हे देशात जाती धर्माच्या नावाने द्वेष पसरवत आहेत. परंतू द्वेशाला केवळ प्रेमाने संपवता येते. हे आम्ही देशभरात सांगत आहोत. आज मागील 45 वर्षातील सर्वाधीक बेरोजगारी वाढली आहे. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जाऊन पोचली आहे, आणि मोदी सरकार देशाची संपत्ती मुठभर लोकांना वाटत सुटल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा - राज्यातील आयटीआयला टाटा सामाजिक विज्ञान संस्था करणार अर्थ सहाय्य; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

NRC आणि CAA विरोधात देशातील सर्व समाजाने आपले सर्व भेद मिटवून एकत्र आले पाहिजे. आपली ही हक्काची लढाई आहे. त्यामुळे आज जो तिरंगा हातात घेतला आहे, तो स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. हेच आपल्याला महात्मा गांधी, आंबेडकर, अब्दुल कलाम आझाद बनण्याची प्रेरणा देणार आहे. यामुळे हा तिरंगा हातात घेऊन देशात NRC, CAA विरोधात रान पेटवू या असेही डॉ. कन्हैया कुमार यांनी आवाहन केले. या आंदोलनात कोणी धर्म वाचविण्यासाठी नाही तर संविधान वाचविण्यासाठी येत आहेत.

या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे. तीच या आंदोलनाची ओळख आहे. स्वातंत्र्य वाचविण्याची ही लढाई आहे. यामुळे आम्हाला आज लढायचे आहे. आज या आंदोलनात ज्या महिला एका हातात मुल आणि दुसऱ्या हातात तिरंगा घेऊन समोर आल्या आहेत. उद्या याच महिला या देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात समोर येणार नाहीत. यासाठी मोदी सरकारने गाफील राहू नये, असा इशाराही कन्हैया कुमार यांनी मोदी सरकारला दिला.

Intro:NRC,CAA विरोधात सगळे भेद मिटवून तिरंगा हातात घ्या, अन् एकत्र या ; विद्यार्थी नेते डॉ. कन्हैया कुमार यांचे आवाहन

mh-mum-01-caanrc-kanhyyakumar-aagripada-7201153

मुंबई, ता. २४ :

NRC,CAA विरोधात जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत आदी सर्व भेद मिटवून एकत्र या. आम्ही भारताचे लोक आहोत. या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे. तीच याची ओळख आहे. यामुळे 'निकलो बंद मकानो से जंग लढो बेइमानो से' असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी आज मुंबईत केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या आणि घोषणाच्या गजरात दाद दिली.

NRC,CAA विरोधात आग्रिपाडा येथे असलेल्या वायएमसीए मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी हे आवाहन केले.

डॉ. कन्हैया कुमार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दर वर्षी पाच लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात, त्यांना डिग्री दाखवून मोदी सरकार नोकरी देणार का? जग फिरून किती गुंतवणूक आणली? असा सवाल करत मोदी शहा यांच्यावर टीका केली.मोदी आणि शहा हे देशात जाती धर्माच्या नावाने द्वेष पसरवत आहेत, परंतु द्वेशाला केवळ प्रेमाने संपवता येते. हे आम्ही देशभरात सांगत आहोत. आज मागील ४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी वाढलीय, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जाऊन पोचली आहे, आणि मोदी सरकार देशाची संपत्ती मुठभर लोकांना वाटत सुटली असल्याचा आरोप त्यांनी केला.

NRC,CAA विरोधात देशातील सर्व समाजाने आपले सर्व भेद मिटवून एकत्र आले पाहिजे आपली ही हक्काची लढाई आहे. त्यामुळे आज जो तिरंगा हातात घेतला आहे, तो स्वातंत्र्याचे प्रतीक आहे हेच आपल्याला, महात्मा गांधी, आंबेडकर, अब्दुल कलाम आझाद बनण्याची प्रेरणा देणार आहे. यामुळे हा तिरंगा हातात घेऊन देशात NRC,CAA विरोधात रान पेटवू या असेही डॉ. कन्हैया कुमार यांनी आवाहन केले.या आंदोलनात कोणी धर्म वाचविण्यासाठी नाही तर संविधान वाचविण्यासाठी लोक येत आहेत.. या आंदोलनाचा चेहरा तिरंगा आहे.. तीच याची ओळख आहे. स्वातत्र्य वाचविण्याची ही लढाई आहे. यामुळे आम्हाला आज लढायचे आहे. आज महिला या आंदोलनात ज्या महिला आज एका हातात मुल आणि दुसऱ्या हातात तिरंगा घेऊन महिला समोर आल्या आहेत. उद्या याच महिला या देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात समोर येणार नाहीत यासाठी मोदी सरकारने गाफील राहू नये, असा इशाराही कन्हैया कुमार यांनी मोदी सरकारला दिला.Body:NRC,CAA विरोधात सगळे भेद मिटवून तिरंगा हातात घ्या, अन् एकत्र या ; विद्यार्थी नेते डॉ. कन्हैया कुमार यांचे आवाहन
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.