ETV Bharat / state

''अभ्यासपूर्ण पद्धतीने नाटकाकडे पाहण्याचा प्रयत्न 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा ही इच्छा''

१०० व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली. गुरुवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नियोजित संमेलनाच्या अध्यक्षांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली.

mumbai
'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल
author img

By

Published : Jan 3, 2020, 8:29 AM IST

Updated : Jan 3, 2020, 12:03 PM IST

मुंबई - अभ्यासपूर्ण पद्धतीने नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोण निर्माण करण्याचा बदल १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा, अशी अपेक्षा १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. गुरुवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नियोजित संमेलनाच्या अध्यक्षांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल

१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने मिळल्यानेच आपण ते स्वीकारले. या पदासाठी निवडणूक घेऊन निवडून यायचे असते तर, आपण त्यासाठी नकार दिला असता, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 'तसं माझा मराठी रंगभूमीशी फारसा संबंध उरलेला नाही कारण शेवटचं 'पडघम' हे नाटक मी १९८५ साली केलं होतं'. लहानपणी सोलापूरमध्ये असताना संगीतकार रा.ना.पवार यांनी आपल्याला आचार्य अत्रे यांच्या 'मी उभा आहे' या नाटकात काम दिले. वयाच्या आठव्या वर्षी रंगभूमीवर पाय ठेवल्यानंतर मिळलेली पहिली टाळी आणि दाद आजही माझ्या लक्षात आहे, असे जब्बार यांनी सांगितले.

एकवेळ कॅमेरा हातात असताना आपण संपूर्ण विश्व दाखवू शकतो. मात्र, ४०-४० च्या रंगभूमीवर तुम्ही नाटक कसे जिवंत करता हे जास्त महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या आयुष्यात मी फार नाटकं केली नाहीत, जेमतेम ८ ते १० नाटक केली. पण, जी नाटक केली त्यात कायम काहीतरी वेगळे शोधण्याचा प्रयत्न केला. मुंबईत फारच कमी वेळा इतर भाषेतील नाटक येतात, आणि ती पहिलीच पाहिजेत यासाठी मराठी तरुण-तरुणीकडे आग्रह केला जातो. आज अनेकवेळा तरुण चांगल्या विषयावर नाटक करत असूनही तालमीला जागा मिळत नाही, हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

आज डॉ. लागू, निळू फुले, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे असते तर मला फार आनंद झाला असता. मी १०० व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असताना त्यांची प्रतिक्रिया कशी राहिली असती ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.

पुलं देशपांडे कला दालनामगचा उद्देश सफल झाला नाही

दादरच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या पु.ल. देशपांडे कला अकादमीतून राज्यभरात घडणाऱ्या उत्तम कलाकृती पहायला मिळाव्यात अशी इच्छा होती. गेल्या १५ वर्षात अशा कलाकृती सादर झाल्या मात्र, त्याचे काही डॉक्युमेंटेशन झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय कला संस्कृती केंद्राप्रमाणे ही कला अकादमी उभी रहावी, ही ईच्छा १५ वर्षानंतरही पूर्ण झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - पिंजाळ प्रकल्प सुरू व्हायला चार वर्षे लागणार- महापौर

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठेही होऊ देत मात्र, ते नाट्य परिषदेच्या लौकिकाला साजेसे होईल अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली. या नाट्य संमेलनाला येणाऱ्या तरुण-तरुणींनी नाट्य संमेलन आवडलं अथवा नाही यांपैकी काहीही प्रतिक्रिया दिली तरीही मला चालेल. मात्र, त्यांनी ते पहायला यायला हवे अशी अपेक्षा 'ईटीव्ही भारत'शी बोलताना डॉ. पटेल यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टला उद्यापासून सुरुवात; दिग्गज असणार उपस्थित

Intro:अभ्यासपूर्ण पध्दतीने नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोण निर्माण करण्याचा बदल 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलनाच्या निमित्ताने व्हावा, अशी अपेक्षा नाट्य 100 व्या सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नियोजित सम्मेलनाच्या अध्यक्षांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

100 व्या अखिल भारतीय नाट्य सम्मेलनाच अध्यक्षपद सन्मानाने मिळल्यानेच आपण ते स्वीकारले, या पदासाठी निवडणूक घेऊन निवडून यायचं असत तर आपण त्यासाठी नकार दिला असता अस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तस माझा मराठी रंगभूमीशी फारसा संबंध उरलेला नाही कारण शेवटच 'पडघम' हे नाटक मी 1985 साली केलं होतं. लहानपणी सोलापूरमध्ये असताना संगीतकार रा.ना.पवार यांनी आपल्याला आचार्य अत्रे यांच्या मी उभा आहे या नाटकात काम दिल. वयाच्या आठव्या वर्षी रंगभूमीवर पाय ठेवल्यानंतर मिळलेली पहिली टाळी आणि दाद आजही माझ्या लक्षात आहे अस जब्बार यांनी सांगितलं.

एकवेळ केमेरा हातात असताना आपण संपूर्ण विशव दाखवू शकतो मात्र 40×40 च्या रंगभूमीवर तुम्ही नाटक कसं जिवंत करता हे जास्त महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या आयुष्यात मी फार नाटक केली नाहीत जेमतेम 8 ते 10 नाटकं केली पण जी नाटक केली त्यात कायम काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला. मुंबईत फारच कमी वेळा इतर भाषेतील नाटक येतात, आणि ती पहिलीच पाहिजेत यासाठी मराठी तरुण तरुणीकडे आग्रह केला जातो. आज अनेकवेळा तरुण चांगल्या विषयावर नाटक करत असूनही तालमीला जागा मिळत नाही हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

आज मला डॉ. लागू, निळू फुले, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे असते तर मला फार आनंद झाला असता. त्यांनी आज मी 100 व्या नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी असताना त्यांची प्रतिक्रिया कशी असेल ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.

पुलं देशपांडे कला दालनामगचा उद्देश सफल झाला नाही

दादरच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या पु.ल. देशपांडे कला अकादमीतुन राज्यभरात घडणाऱ्या उत्तम कलाकृती पहायला मिळाव्यात अशी इच्छा होती. मात्र गेल्या 15 वर्षात आशा कलाकृती सादर झाल्या पण त्याचा काही डॉक्युमेंटेशन झालं नाही. त्यामुळे राष्ट्रीय कला संस्कृती केंद्राप्रमाणे ही कला अकादमी उभी रहावी ही ईच्छा 15 वर्ष होऊनही पूर्ण झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक केली.

100 व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठेही होऊ देत मात्र ते नाट्य परिषदेच्या लौकिकाला साजेसं होईल अशी अपेक्षा डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. या नाट्य सम्मेलनाला येणाऱ्या तरुण तरुनीनी हे नाट्य सम्मेलन आवडलं अथवा आवडलं नाही यांपैकी काहीही प्रतिक्रिया दिली तरीही मला चालेल मात्र त्यांनी ते पहायला यायला हवं अशी अपेक्षा ई टीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली. त्यांच्याशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी विराज मुळे यांनी.

Body:.

Conclusion:.
Last Updated : Jan 3, 2020, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.