ETV Bharat / state

गर्दीचे खोटे व्हिडिओ टाकल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा - रेल्वे प्रशासन

गेल्या वर्षीचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल केले जात असून रेल्वे आणि शासनाची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना सारख्या संकटकाळात असे व्हिडीओमुळे परिस्थिती तणावपूर्ण होऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले की अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ व्हायरल करू नयेत.

रेल्वे प्रशासन
रेल्वे प्रशासन
author img

By

Published : Apr 9, 2021, 4:52 PM IST

मुंबई - गेल्यावर्षी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकावरून हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर गावाकडे स्थलांतर करू लागले होते. यावेळी राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर काही प्रमाणात कामगार स्थलांतर करू लागले आहेत. मात्र गेल्यावर्षीचे खोटे व्हिडिओ टाकून काही समाजकंटक अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. अशा समाजकंटकाना धडा शिकवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानिक पोलिस आणि सायबर सेलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीचे किंवा खोटे व्हिडिओ वायरल करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माहिती देतांना अधिकारी
..तर कारवाईराज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल पर्यंत पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने मुंबईत काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावी जात आहेत. विशेष म्हणजे याच कालावधीत गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला होता. परिणामी लाखोंच्या संख्येत परप्रांतीय मजुरानी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. सध्या तशी परिस्थिती निर्माण झालेली असून काही प्रमाणात परप्रांतीय कामगार स्थलांतर करू लागले आहे. गेल्या वर्षीचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल केले जात असून रेल्वे आणि शासनाची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना सारख्या संकटकाळात असे व्हिडीओमुळे परिस्थिती तणावपूर्ण होऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले की अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ व्हायरल करू नयेत.

अन्यथा कारवाई
गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून 50 पेक्षा जास्त विशेष गाड्या चालविण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान कोविड नियमाचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. याशिवाय समाज माध्यमावर प्रकाशित झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासूनच त्यावर प्रवाशांनी विश्वास ठेवावा. तसेच रेल्वेच्या गर्दी विषयी कोणताही व्हिडिओ विना सत्यात तपासून फॉरवर्ड करू नयेत, अन्यथा नागरिकांवर कारवाई होण्याची शक्यता आहेत.

हेही वाचा-मुस्लिम महिलेचा मृतदेह हिंदू कुटुंबाला तर हिंदू महिलेचा मृतदेह मुस्लिम कुटुंबाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.