मुंबई Dog Leo News : मुंबई पोलीस दलात अनेकदा श्वान महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक गुन्ह्यांमध्ये श्वानाचा पुरावे शोधण्यासाठी वापर केला जातो. मुंबई पोलिसांच्या श्वानानं महत्वाची कामगिरी बजावत यशस्वीरित्या अपहरण झालेल्या सहा वर्षीय मुलाची सुखरुप सुटका केलीय. या श्वानाचं नाव लिओ असून मुंबई पोलीस दलात लिओ या श्वानानं केलेल्या कामगिरीमुळं त्याचं कौतुक होतंय. पवई पोलिसांच्या 'लिओ' या श्वानानं अपहरण झालेल्या 6 वर्षांच्या मुलाला अवघ्या 90 मिनिटांत शोधून काढलंय.
खेळताना मुसगा गायब : अंधेरी पूर्व येथील के बी एम कंपाउंड झोपडपट्टी इथं राहणाऱ्या महिला विमला फूलचंद कोरी यांनी 24 नोव्हेंबरला रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपला सहा वर्षांचा मुलगा सापडत नसल्याबाबतची तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेचा अल्पवयीन मुलगा विवेक फुलचंद कोरी हा सहा वर्षीय चिमुकला 23 नोव्हेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला. त्यामुळं त्याच्या मित्रांसोबत खेळाताना तो हरवल्याची तक्रार त्याच्या आईनं पवई पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
मुलाचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉडची मदत : या गुन्हयाचं गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गुन्हे शाखेचे पथक, पवई मोबाईल यांनी हरवलेल्या मुलाचा कसून शोथ सुरू केला. तसंच मुख्य नियंत्रण कक्षसाच्या मार्फतीनं ऑल रिझन कंट्रोल, ट्रफिक कंट्रोल रुम यांना सदर मुलाची सविस्तर माहिती व वर्णन देऊन अलर्ट करण्यात आले होते. तसंच घटनास्थळ परिसर हा स्लम एरिया असून सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळं मुलाचा शोध घेण्यासाठी तात्काळ डॉग स्कॉडची मदत घेण्यात आली. पोलिसांचा श्वान असलेल्या लिओला हरवलेल्या मुलाच्या राहत्या घरी नेवून दिवसा मुलानं परिधान केलेले टी शर्टच्या वासाच्या आधारे शोध मोहिम राबविण्यात आली होती.
प्रकरणाचा अधिक तपास सुरु : ही शोध मोहिम सुरु असताना दरम्यान हरवलेला मुलगा हा सुखरुप 24 नोव्हेंबर च्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास आंबेडकर उद्यान, अशोक टॉवर परिसर इथं मिळून आलाय. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या घटनास्थळाचे तसंच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, स्थानिक लोकांच्या मदतीनं अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे दिली आहे. पोलीस डॉग लिओ व त्यांचे हँडलर यांनी तत्परतेनं व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वेळीच घेतलेले निर्णय व चातुर्यच्या मदतीनं हरविलेल्या मुलाचा शोध घेवून त्याला सुखरुपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आलंय.
हेही वाचा :