मुंबई - 15 फेब्रुवारी रोजी मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये भीम संदेश तुपे या डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या संदर्भात आग्रिपाडा पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र आत्महत्येचे कारण आता समोर आले असून, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये डॉ. तुपे यांच्या प्रेयसीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरल्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवारांची वीज तोडणीला स्थगिती; दोन दिवसात विजेच्या प्रश्नावर तोडगा काढणार
डॉ. भीम संदेश तुपे यांचे नागपूरमधील एका तरुणीवर प्रेम होते. दोघेही एमबीबीएस शिक्षण पूर्ण करत होते. पुढील अभ्यासासाठी डॉ. तुपे हे मुंबईत आले, तर तरुणी नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. यानंतर ते दोघेही फोन व व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
डॉ. तुपे हे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या औरंगाबाद येथील गावी जाऊन आले होते. त्यानंतर तुपे यांनी नायर रुग्णालयातील त्यांच्या निवास स्थानात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या संदर्भात आग्रिपाडा पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, या मागचे कारण तपासले असता प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी ठरल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.
हेही वाचा - '12 सदस्य राज्यपालांनी मांडीखाली दाबून ठेवले आहेत, ते मोकळे करावे'