ETV Bharat / state

Mumbai Crime : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डॉक्टरला मारहाण, दोन पोलीस अधिकाऱ्यांसह तीनजण निलंबित - Driving In No Entry In Mumbai

दोन डॉक्टरांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. इतकेच नव्हेतर कर्मचाऱ्यांनी त्यांना पट्ट्याने मारहाण करत पैसे उकळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Police
मुंबई पोलीस
author img

By

Published : May 6, 2023, 4:16 PM IST

मुंबई : डॉक्टरला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन डाॅक्टरांना पोलीस ठाण्यात नेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पट्ट्याने मारहाण करत पैसे उकळल्याचा खळबळजनक प्रकार कांदिवलीमध्ये घडला आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसह येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कर्तव्यातील त्रुटींवरुन, शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन: पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलला दोन डॉक्टरांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे सुरुवातीला या डॉक्टरांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना समता नगर पोलीस ठाण्यात बराच वेळ उभे ठेवण्यात आले. नंतर पुढे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस नाईक अशा दोघांनी मिळून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप डाॅक्टरांकडून करण्यात आला आहे. पीडित डॉक्टरांनी समता नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधून, आपल्यासोबत पोलीस ठाण्यात घडलेली धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

कायदेशीर कारवाई केली: प्राथमिक चौकशीत डॉक्टरांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. अखेर डाॅक्टरांना मारहाण करुन त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या दोन्ही पोलिसांसह घटनेवेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकाला त्याच्या कनिष्ठांना कायदेशीर कारवाई करताना, मार्गदर्शन करण्यास अयशस्वी झाल्याचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले आहे. या पोलिसांविरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच याआधीही अत्यावश्यक सेवेत असलेल्या डाॅक्टरांना पालिसांकडून मारहण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News घरातील नोकराकडूनच ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून 1 कोटी 31 लाख लंपास 12 तासात आरोपीला बेड्या
  2. Mumbai Crime News मायलेकाच्या अपहरणाचे गुढ उकलले पाच जणांच्या अटकेतून धक्कादायक माहिती समोर
  3. Mumbai Crime News आरटीआयमध्ये खोटी माहिती देणे पडले महागात तपास अधिकारी अडकले कारवाईच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.