मुंबई - राज्य सरकार तर्फे राज्यातील आशा वर्कर सूचना देण्यात आलेल्या आरोग्य किटमध्ये गर्भाशय आणि पुरुष लिंगाची प्रतिकृती आहे. मात्र, ग्रामीण भागातील तसेच सर्व महिलांपर्यंत शरीराच्या अवयवांची योग्य माहिती आणि कार्य जावे ते समजून सांगण्यासाठी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून गर्भाशय आणि पुरुष लिंगाच्या प्रतिकृतीचा वापर व्हावा यादृष्टीने या दोन वस्तू या किटमध्ये देण्यात आल्या आहेत. या वस्तूंच्या आधारे शरीराच्या अवयवांची योग्य माहिती देऊन आपल्याला हवा तो परिणाम साधावा यासाठी सकारात्मक दृष्टीने त्याचा वापर व्हावा आणि त्याचदृष्टीने या साधनांकडे पाहिले पाहिजे, असे मत आरोग्य संचालिका अर्चना पाटील ( Health Director Archana Patil ) यांनी व्यक्त केले आहे.
आशा वर्कर्स यांनासुद्धा यासाठी ही साधने किटमध्ये देण्यात आली आहेत. पुढे त्याच्याकडे कोणत्याही गैर पद्धतीने पाहू नये, अशी प्रतिक्रिया आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी व्यक्त केली आहे. हेल्थ आरोग्य किटमध्ये पुरुष लिंगाची प्रतिकृती दिल्याने महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होते आहे आणि आशा वर्कर्स त्याचा वापर कशा पद्धतीने समजावून सांगतील. त्यांच्या पुढे अडचण निर्माण झाली आहे, अशा पद्धतीची चर्चा झाल्यानंतर डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत स्पष्टता केली आहे.
हेही वाचा - राज्य सरकारच्या कुटुंब नियोजनाच्या 'त्या' निर्णयाने आशा सेविका नाराज, काय आहे नेमक कारण?