ETV Bharat / state

​Buldhana Bus Accident : खासगी बस अपघातग्रस्तांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी - फडणवीस - private bus accident victims

बुलडाणा जिल्ह्यात खासगी बस अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. तसेच अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

​Buldhana Bus Accident
​Buldhana Bus Accident
author img

By

Published : Jul 1, 2023, 5:39 PM IST

मुंबई : समृद्धी महामार्गावरील अपघात ( Accident on Samriddhi Highway ) रोखण्यासाठी टोल नाक्यावर स्मार्ट यंत्रणा बसवणे, सीसीटीव्हीसह वाहनचालकांचे प्रबोधन करण्याचा विचार सरकारच्या विचाराधीन असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. समृद्धी महामार्गावर सिंदखेडजवळ नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या घटनेत सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली.

डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवली जाणार : बस दुभाजकावर आदळल्याने डिझेलची टाकी फुटून बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात 26 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण सुरक्षित आहेत. मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde )यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री आणि मी तातडीने घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्याची सखोल चौकशी केली जाईल. आगीत जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अपघात रोखण्यासाठी स्मार्ट सिस्टम : अतिशय चांगल्या पध्दतीने समृद्धी महामार्गाचे काम करण्यात आले आहे.​ वाढते अपघात रोखण्यासाठी स्मार्ट सिस्टीम लावण्या​चे शासनाच्या विचाराधीन आहे. सीसीटीव्ही देखील महामार्गावर लावण्यात येत आहेत. त्यामुळे वाहन चालकांच्या वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. तसेच, समृध्दी महामार्गाच्या टोल नाक्यांवर वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीसांनी केली घटनास्थळाची पाहणी : जिल्ह्यातील सिंदखेड राजा समृद्धी महामार्गावर दुपारी 1.30 च्या दरम्यान झालेल्या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. (Buldhana bus accident) यावेळी त्यांनी परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा करून अपघाताचे कारण जाणून घेतले. (Chief Minister Shinde and Deputy Chief Minister Fadnavis) लक्झरी बसचे दार उघडण्यात आलेले अपयश, प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आलेले अपयश यामुळे मोठा अपघात झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • हेही वाचा -
  1. Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघातस्थळाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट; जखमींची केली विचारपूस
  2. Bus Accident in Buldhana : बसच्या फिटनेससोबतच प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष; गमवावा लागला जीव
  3. Bus Accident in Buldhana : बुलडाणा बस अपघातात 26 जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.