ETV Bharat / state

Diwali Food and Recipe : साखरेची पुरणपोळी अशा पद्धतीने करा; सर्वांना नक्की आवडतील - पुरणपोळी बनवण्यासाठी साहित्य

पुरणपोळी ( Puranpoli ) हा पदार्थ सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये दिवळी सण ( Diwali festivel ) आला की सर्वात प्रथम पुरणपोळी केली जाते. काहींना साखरेची पुरणपोळी ( Sugar Puranpoli ) आवडते. पहायला गेले कि साखरेची व गुळाची पुरणपोळी यांच्या कृतीमध्ये थोडासाच फरक आहे. घरता जर पाच जाणांसाठी पुरणपोळी करायची असेल तर खाली सामान ( How To Make Puranpoli ) वापरा.

Diwali Food and Recipe
साखरेची पुरणपोळी
author img

By

Published : Oct 14, 2022, 1:54 PM IST

मुंबई : पुरणपोळी ( Puranpoli ) हा पदार्थ सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये दिवळी सण ( Diwali festivel ) आला की सर्वात प्रथम पुरणपोळी केली जाते.पुरणपोळी ज्या स्त्रीला येते ती गृहिणी उत्तम स्वयंपाकी असे महाराष्ट्रातील गणित असते. कारण चविष्ट पुरणपोळी करण्यासाठी स्त्रीयांना खरी कसरत करावी लागते. पुरणपोळी दोन प्रकारे करता येते साखरेची पुरणपोळी आणि गुळाची पुरणपोळी. महाराष्ट्रमध्ये गावाकडील गृहिणी गुळाची पुरणपोळी करण्यास पसंती ( Diwali Food and Recipe ) दर्शवतात. काहींना साखरेची पुरणपोळी ( Sugar Puranpoli ) आवडते.घरता जर पाच जाणांसाठी पुरणपोळी करायची असेल तर खाली सामान ( How To Make Puranpoli ) वापरा.

साहित्य : १/२ किलो डाळ, १/२ किलो साखर, ३ ग्लास गव्हाचे पीठ, वेलची पूड (आवडीनुसार ), तेल (अंदाचे दोन चमचे ), मीठ (चवीनुसार), खायचा कलर / हळद (एक चीमट) हे सर्व पुरणपोळी बनवण्यासाठी साहित्य वापरले ( Puranpoli Ingredient ) जाते. यात तुम्ही तुमच्या आवडीचे आणखी जिन्नस टाकू शकता.

कृती : १/२ किलो डाळ स्वच्छ धूउन घ्या. एका स्वच्छ कुकरमध्ये ३ ग्लास पाणी गरम करून त्यात धूऊन घेतलेली डाळ शिजत घाला. त्यामध्ये एक टीस्पून तांदूळ घाला. त्याला कुकरच्या 3 शिट्या द्या. डाळ शिजली की कुकरमधून ती दुसऱ्या भांडयामध्ये काढून घ्यावी, त्यामध्ये १/२ किलो साखर घाला. गोड कमी हवे असेल तर थोडी साखर कमी वापरा. साखर घातलेली डाळ गॅसवरती परत शिजवावी, पुरण शिजायला लागले कि भांड्याला खाली लागते, पुरण घट्ट आले कि गॅसवरून खाली उतरून घ्यावे. त्यामध्ये चवी प्रमाणे वेलचीची पूड घालावी व ते पुरण एकजीव करून पुरण गरम आहे तो पर्यंत वाटून घ्या. गव्हाच्या पीठात चवी प्रमाणे मीठ घाला .नंतर दोन चमचे तेल घाला व थोडे थोडे पाणी घालत कणिक मळून घ्या. पोळी लाटताना जेवढा कणकेचा गोळा असेल त्याच्या पेक्षा थोडेसे जास्त पुरण त्यामध्ये घालावे आणि पोळी लाटावी. पोळी भाजताना थोडेसे तांबूस बारीक बारीक फोड आल्यानंतर पोळी काढावी.

या गोष्टींची काळजी घ्या : १/२ किलो डाळ म्हणजे अंदाजे १.५ ग्लास डाळ. पुरणाच्या दुपट पीठ वापराव. कणिक मळल्यानंतर किमान एक तासभर ठेवावी. पुरण थंड झाल्यानंतर पोळी करावी. पिठाची पोळी लाटताना कणकेच्या डबल पुरण घालून लाटावी. तेलाची पोळी लाटताना कणकेपेक्षा थोडेसे जास्त पुरण घालुन लाटावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.