ETV Bharat / state

BJP Diwali Celebration : 'सबका साथ सबका विकास, आता सबके साथ', म्हणत भाजपची दिवाळी पहाट

जे दुसऱ्याच्या यश-अपशावर सदैव जळत राहतात, ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? असा राजकीय टोला लगावत भाजपा नेते आमदार आशिष शेलार ( BJP leader MLA Ashish Shelar ) यांनी मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवानंतर आता मुंबई भाजपा तर्फे मुंबईत दिवाळी धुमधडाक्यात साजरी ( Diwali is celebrated in Mumbai ) होणार असल्याचे सांगितले आहे.

author img

By

Published : Oct 20, 2022, 7:30 PM IST

BJP Diwali Dawn
BJP Diwali Dawn

मुंबई - जे दुसऱ्याच्या यश-अपशावर सदैव जळत राहतात, ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? असा राजकीय टोला लगावत भाजपा नेते आमदार आशिष शेलार ( BJP leader MLA Ashish Shelar ) यांनी मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवानंतर आता मुंबई भाजपा तर्फे मुंबईत दिवाळी धुमधडाक्यात साजरी ( Diwali is celebrated in Mumbai ) होणार असल्याचे सांगितले आहे.मुंबईत ते बोलत होते.

भाजपचे मुंबईत २०० पेक्षा अधिक कार्यक्रम - आमदार अँड आशिष शेलार यांनी आज प्रदेश भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुंबईत होणाऱ्या दिपोत्सवाची माहिती दिली. मुंबई भाजपा तर्फे रांगोळ्या,गीत, संगीत आणि नृत्य आणि दिव्यांची आरास करुन भाजपा मुंबईकरांच्या दिवाळीत आनंद भरणार आहे. भाजपातर्फे मुंबईत एकुण २३३ हून अधिक ठिकाणी दिपोत्सव, दिवाळी संध्या आणि दिवाळी पहाट हे कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आले आहेत.जे सदैव आभास निर्माण करतात की आम्ही म्हणजे मुंबई ते ना कोरोना काळात मुंबईकरांसोबत नव्हते आणि या सण उत्सवात मुंबईकरांसोबत कुठेच दिसत नाहीत, असा अप्रतक्ष टोला ही यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

राज यांच्या दीपोत्सवाला शिंदे -फडणवीस - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी शिवाजी पार्क येथील मैदानात दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही शुक्रवारी सायंकाळी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे - फडणवीस सरकारशी मनसेची वाढत चाललेली जवळीक बघता या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दीपोत्सव कार्यक्रमाला शिंदे - फडवणीस यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजन - आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात मोर्चेबंदी करायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार सर्वच राजकिय पक्षांनी दिवाली पहाट, दीपोत्सव आणि कार्यक्रमांच, विविध स्पर्धांचं आयोजन सुद्धा केलेले आहे. एकीकडे भाजप व मनसेने मोठ्या प्रमाणात दीपावली कार्यक्रमाचे केलं असलं तरीसुद्धा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या तरी पक्षातर्फे असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही आहे. परंतु स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये आमदार, कार्यकर्ते हे अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. साहजिकच मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी ही चढावर सुरू असल्याचे चित्र असून मतदारांबरोबर कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांंबरोबर गिफ्टची मेजवानी ही यंदा जोरात दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.