ETV Bharat / state

मंदीबाबत बोलण्यास मी अर्थतज्ञ नाही - दिवाकर रावते - मुंबई शिवसेना लेटेस्ट न्यूज

देशातील मंदीबाबत बोलण्यास मी अर्थतज्ञ नाही अशी प्रतिक्रिया मंत्री दिवाकर रावते यांनी मंदी बाबत बोलताना दिली. या वेळीत ते बंडखोरांचा शिवसेनेला काही परिणाम होणार नसल्याचे बोलले.

परिवहन मंत्री दिवाकर रावते
author img

By

Published : Oct 14, 2019, 9:34 PM IST

मुंबई - देशात मंदीची लाट आणि माझा काही संबंध नाही, मंदीबाबत बोलण्यास मी अर्थतज्ञ नाही, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. देशातील मंदीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. परिवहन खात्यातून 832 अधिकाऱ्यांची पहिली भरती सरकारमध्ये केली. त्यातील 200जण प्रशिक्षण घेत आहेत. 2 लाख 36 हजार रिक्षा व 33हजार काळी-पिवळी टॅक्सी रस्त्यावर आणल्या. परिवहन खात्यात गेल्या 5 वर्षात 50 हजार नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा दिवाकर रावते यांनी केला आहे. नोकरी गेली तर चिंता असते मंदी वगैरे काही नसते असे ते म्हणाले.

परिवहन मंत्री दिवाकर रावते

10 रुपयात सकस आहार थाळी ही बचतगटांच्या माध्यमातून गरजू गरीब लोकांना उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठीच आर्थिक नियोजनाचा आराखडा सत्तेत आल्यावर तयार केला जाईल असे परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटले. शिवसेनेची सत्ता गेल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने गरीब लोकांना 1 रुपयात उपलब्ध होणारी झुणका भाकर योजना बंद केली. त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली सैनिकी शाळा अनुदान देणं थांबवून बंद पाडल्या. वृद्धाश्रमांचे सरकारने अनुदान बंद केले. जनकल्याणासाठी लोकांच्या हिताच जे असेल त्या योजना शिवसेना पुढे नेणार, असा विश्वास दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.

निवडणुकीत पक्षाने दिलेले उमेदवार निवडून येतात, बंडखोरांना राजकिय दृष्ट्या तडीपार व्हावे लागते. त्यामुळे बंडखोरांचा शिवसेनेला काही परिणाम होणार नसल्याचे रावते म्हणाले. शिवेंद्रराजे लढत असलेली साताऱ्याची जागा शिवसेनेची होती. मात्र, युतीत ती भाजपच्या वाटेला गेली. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे सातारकर असल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे सेनेत हवे असे शिंदे वाटले असेल असे ते म्हणाले. युतीकरण्याबाबतची भूमिका लोकसभेच्या वेळी ठरलेली होती. दिलेला शब्द शिवसेना पाळते म्हणून आम्ही आज युतीत असल्याचे रावते म्हणाले. विरोधकांकडे सत्तेच पाऊल जाऊ नये म्हणून तडजोडी कराव्या लागतात. महाराष्ट्राचा विकास महत्वाचा आहे, विकास कामांना गती मिळावी यासाठी युती केल्याचे रावते यांनी युतीबाबत स्पष्टीकरण दिले.

शिवसेनेच्या 100 जागा गाठण्याचा निर्धार आहे. आदित्य ठाकरे यांची इच्छा होती म्हणून ते राजकारणात आले. अजून आदित्य यांना अनुभव घ्यायचा आहे. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं शब्द पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत रावते यांनी बोलणे टाळले.

Intro:मुंबई - देशात मंदीची लाट आणि माझा काही संबंध नाही, मंदीबाबत बोलण्यास मी अर्थ तज्ञ नाही अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी देशातील मंदीबाबत शिवसेनेची भूमिका काय यावर दिली.Body:परिवहन खात्यातून 832 अधिकाऱ्यांची पहिली भरती सरकारमध्ये केली, त्यातील 200जण प्रशिक्षण घेत आहेत. 2 लाख 36 हजार रिक्षा व 33हजार काळी पिवळी टॅक्सी रस्त्यावर आणल्या. परिवहन खात्यात गेल्या 5 वर्षात 50 हजार नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा दिवाकर रावते यांनी केला आहे. नोकरी गेली तर चिंता असते मंदी वगैरे काही नसते असे ते म्हणाले.
10 रुपयांत सकस आहार थाळी ही
बचतगटांच्या माध्यमातून गरजू गरीब लोकांना उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठीच आर्थिक नियोजनाचा आराखडा सत्तेत आल्यावर तयार केला जाईल असे परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटले.
शिवसेनेची सत्ता गेल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने गरीब लोकांना 1 रुपयांत उपलब्ध होणारी झुणका भाकर योजना बंद केली. त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली सैनिकी शाळा अनुदान देणं थांबवून बंद पाडल्या.तसेच वृद्धाश्रमांच सरकारने अनुदान बंद केलं. जनकल्याणासाठी लोकांच्या हिताच जे असेल त्या योजना शिवसेना पुढे नेणार असा विश्वास दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत पक्षाने दिलेले उमेदवार निवडून येतात, बंडखोरांना राजकिय दृष्ट्या तडीपार व्हावं लागतं. त्यामुळे बंडखोरांचा शिवसेनेला काही परिणाम होणार नसल्याचे रावते म्हणाले.
शिवेंद्रराजे लढत असलेली साताऱ्याची जागा शिवसेनेची होती,मात्र युतीत ती भाजपच्या वाटेला गेली. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे सातारकर असल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे सेनेत हवे असे शिंदे वाटलं असेल असे ते म्हणाले.Conclusion:युतीकरण्याबाबतची भूमिका लोकसभेच्या वेळी ठरलेली होती. दिलेला शब्द शिवसेना पाळते म्हणून आम्ही आज युतीत असल्याचे रावते म्हणाले.
विरोधकांकडे सत्तेच पाउल जाऊ नये म्हणून तडजोडी कराव्या लागतात. महाराष्ट्राचा विकास महत्वाचा आहे,विकास कामांना गती मिळावी यासाठी युती केल्याचे रावते यांनी युतीबाबत स्पष्टीकरण दिले.
शिवसेनेचा 100 जागा गाठण्याचा निर्धार आहे. आदित्य ठाकरे यांची इच्छा होती म्हणून ते राजकारणात आले. अजून आदित्य यांना अनुभव घ्यायचा आहे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं शब्द पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत रावते यांनी बोलणे टाळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.