ETV Bharat / state

विधान परिषद निवडणूक : सहाव्या जागेवरून महाविकासआघाडीत मतभेद, मुख्यमंत्री ठाकरे संतप्त - legislative council 6th seat

काँग्रेस आपल्या सहाव्या उमेदवारीच्या मुद्यावर ठाम असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत.

cm uddhav thakre upset
मुख्यमंत्री ठाकरे
author img

By

Published : May 10, 2020, 2:11 PM IST

मुंबई- विधान परिषदेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद दिसून येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून ५ जागा निश्चित होत असताना बिनविरोध निवडणुकीची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने सहाव्या जागेवरही उमेदवार दिल्याने शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

याच दरम्यान काँग्रेस आपल्या सहाव्या उमेदवारीच्या मुद्यावर ठाम असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. आघाडीत असेच वातावरण असल्यास निवडणूक लढवणार नाही, अशी टोकाची भूमिका ठाकरे यांनी घेतली असल्याचे शिवसेनेच्या गोटात चर्चिले जात आहे.

दरम्यान, यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. बैठकीनंतर सदर मुद्यावर मुख्यमंत्री ठाकरे आपला निर्णय कळवणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.