ETV Bharat / state

Appointment of Dange : परमवीर सिंग विरोधात तक्रार करणाऱ्या डांगेंच्या नियुक्ती मुळे पुन्हा चर्चा - Paramvir Singh

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी शुक्रवारी 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ल्या करत आंदोलन (ST workers' agitation) केले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी गावदेवी विभागातील दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. त्यांच्याजागी परमवीर सिंग (Paramvir Singh) यांच्यावर आरोप करणारे अनुप डांगे यांची नियुक्ती केल्याने पोलिस विभागात पुन्हा चर्चांना सुरु झाल्या आहेत.

Anup Dange
अनुप डांगे
author img

By

Published : Apr 11, 2022, 11:34 AM IST

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी शुक्रवारी 8 एप्रिल रोजी एसटी कामगारांनी आंदोलन केले. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांवर टीका होत आहे. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गावदेवी विभागातील डीसीपी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तडकाफडकी उचलबांगडी करत वरिष्ठ पोलीस अधिकारी रामप्यारे राजभर यांचे निलंबन केले. नंतर तेथे वरिष्ठ अधिकारी म्हणून परमवीर सिंग यांच्यावर आरोप करणारे अनुप डांगे यांची नियुक्ती केल्याने पुन्हा एकदा पोलिस विभागात चर्चांना ऊत आला आहे.

रामप्यारे राजभर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गृह विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डर्टी बन्स पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाली होती. परमबीर सिंह यांनी आरोपीच्या यादीतून एकाचे नाव काढण्यास सांगितल्याचा आरोप करत डांगे यांनी पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच डांगे यांची आता गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे.

अनुप डांगे यांच्या नियुक्तीमुळे पोलीस खात्यामध्ये पुन्हा चर्चा होत आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावल्यानंतर त्यांच्या वर राज्य सरकारकडून अनेक कारवाया करण्यात आल्या होत्या. परमवीर सिंह यांच्या विरोधात अनेक खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. परमवीर सिंग यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनुप डांगे यांनी केली होती. त्यानंतर आता अनुप डांगे यांची गृह विभागाकडून ज्या पोलीस स्टेशन मध्ये अनुप डांगे आणि परमवीर सिंग यांचा वाद झाला होता त्याच पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती केल्याने पुन्हा एकदा या प्रकरणात चर्चा सुरू झाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांनी यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही डांगे यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. फेब्रुवारी 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. 2 फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आलेल्या या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. त्याबाबत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे.

हेही वाचा : Sanjay Raut Vs Somaiya : सोमय्या पिता-पुत्र दोन ठग कुठे पळून गेले? -संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.