ETV Bharat / state

Coronavirus : औषध टंचाईच संकट ? अपुरे मनुष्यबळ आणि साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था विस्कळीत - कोरोना विषाणू

अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबईसह राज्यभरातील औषध दुकाने सुरु आहेत. सध्या मास्क, सॅनिटायझर्सची मागणी मोठी आहे. पण त्याचवेळी इतर आजारांवरील औषधांचीही विक्री वाढती आहे. लॉकडाऊन पुढेही असेच सुरू राहिले तर औषधे मिळणार नाहीत, असे म्हणत नियमित लागणाऱ्या औषधाची साठेबाजी केली जात आहे.

drug delivery system
मनुष्यबळ आणि साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था विस्कळीत
author img

By

Published : Mar 29, 2020, 2:55 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व क्षेत्रावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. मात्र, त्याचवेळी आता अत्यावश्यक, त्यातही आरोग्य क्षेत्रातीलच औषध वितरणावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणि औषध साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था सध्या काही अंशी विस्कळीत झाली आहे. ही परिस्थिती पुढेही अशीच राहिली, तर औषध टंचाईचे संकट उभे ठाकण्याची भीती व्यक्त होत आहे.

मनुष्यबळ आणि साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था विस्कळीत

अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबईसह राज्यभरातील औषध दुकाने सुरू आहेत. सध्या मास्क, सॅनिटायझर्सची मागणी मोठी आहे. पण त्याचवेळी इतर आजारांवरील औषधांचीही विक्री वाढती आहे. लॉकडाऊन पुढेही असेच सुरू राहिले तर औषधे मिळणार नाहीत, असे म्हणत नियमित लागणाऱ्या औषधाची साठेबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे अनेक औषधनिर्मिती कंपन्यामधील कामगार कामावर येत नसल्याने उत्पादनावर परिमाण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्या कंपन्या औषध निर्मिती करत आहेत, त्यांना औषधांची वाहतूक करण्यासाठी वाहने आणि कर्मचारी मिळत नसल्याचे चित्र आहे.

एक तर कोरोनाच्या भीतीने कर्मचारी येत नाहीत. तर दुसरे म्हणजे, कामावर जाताना रोखलं जात असल्याने, मारले जात असल्यानेही कर्मचारी येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईसह राज्यभर पुरेसा औषधसाठा आहे. पण ही परिस्थिती पाहता, लवकरच औषधटंचाई निर्माण होण्याची शक्यता फार्मासिस्ट शशांक म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे रुग्णांनी गरज नसताना औषधची साठेबाजी करू नये, तसेच सरकारने औषध वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट यांनी केली आहे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.