मुंबई - ज्येष्ठ लेखक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीवरील एक चतुरस्त्र लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पु. ल. देशपांडे यांच्या गाजलेल्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाच नाट्य रूपांतर मतकरी यांनी केले होते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. तर पुढे याच नाटकाची 'झी मराठी' वहिनीसाठी मालिका तयार करताना देखील त्याची पटकथा तयार करण्याची जबाबदारी मतकरी यांनी घेतली होती. कोणत्याही पुस्तकाच रुपांतरण करताना ती एक स्वतंत्र कलाकृती आहे, असे समजून ते लिखाण करत असत, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
मध्यमवर्गीय भावभावना आवडेल रुचेल अशी नाटके असो किंवा वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या 'गहिरे पाणी' यासारख्या गूढकथा असो किंवा मग लहान मुलांचे रंजन करणारी 'अलबत्या गलबत्या' सारखी बालनाट्य असो मतकरी यांची लेखणी कोणत्याही एका विशिष्ट साच्यात बांधली गेली नाही. एवढेच काय तर, महाभारत संपल्यावर पुढे काय घडले हे त्यांनी आपल्या 'अरण्यक' या नाटकाद्वारे अत्यंत वेगळ्या भाषाशैलीत मांडले. त्यांच्या जाण्याने ताकदीचा सिद्धहस्त लेखक आपल्यातून निघून गेल्याने मराठी रंगभूमीच अपरिमित नुकसान झाले असल्याची भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
'रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीवरचा चतुरस्त्र लेखक हरपला' - Ratnakar Matkari news
ज्येष्ठ लेखक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीवरील एक चतुरस्त्र लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.