मुंबई - दिवाळीचा सण येत आहे. लवकरच घरी पाहूण्याची लगभग सुरू ( Dilwali Food And Recipe ) होईल. त्यांच्या स्वगतासाठी विशिष्ट पेय किंवा ड्रींग्स यात करण्यासाठी आम्ही काही ड्रिंग्स घेऊन आलो आहोत. तुम्ही रिफ्रेशमेंट ड्रिंक म्हणून काय बनवायचे याचा विचार केला नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच कामी येईल.
चॉकलेट हेझलनेट मिल्कशेक - खूप साऱ्या लोकांना चॉकलेट हेझलनेट मिल्कशेक ( Chocolate Hazelnet Milkshake ) अवडते. त्यात ड्रायफ्रूट टाकले तर ते आणखी छान बनते. तुम्ही थंडगार हेझलनट मिल्कशेक तयार करू शकता. त्यासाठी तुम्ही दूध, चॉकलेटचे तुकडे आणि बर्फ वापरू शकता. हे सर्व सर्वींग ग्लासमध्ये मिक्स करा. तुम्हाला गोडवा वाढवायचा असेल तर चॉकलेट सीरप टाकू शकता.
चेरी जिंजर आईस टी - चेरी जिंजर आईस टी बनवण्यासाठी व्हॅनिला शुगर, चिली शुगर, आल्याचा रस, चेरी रस, लिंबाचा रस, द्राक्षाचा रस या गोष्टींचा वापर ( Cherry Ginger Ice Tea ) होतो. हे सर्व साहित्य आणि रस एका भांड्यात मिसळा आणि फ्रीजमध्ये थंड करा. आणि तयार चहा प्या .
पाईनेप्पल ड्रिंक - अनेक लोक पाककृतींना अननसाची चव देतात. तुम्ही या फ्लेवरचे मॉकटेल ड्रिंक तयार करू ( Pineapple drink ) शकता. त्यासाठी अननसाचे तुकडे, बर्फ, लिंबाचे काप, अननस ज्यूस, हे सामान लागेल. दोन ते तीन चमचे स्ट्रॉबेरी सिरप अननसाच्या रसात मिसळा. ड्रिंक थंड करण्यासाठी बर्फाचे तुकडे त्यात मिसळा. त्यानंतर लिंबाचे काप ग्लासात टाका. अननसाचे छोटे तुकडे करून प्या. आपल्या इच्छित ग्लासमध्ये पाईनेप्पल ड्रिंक सर्व्ह करा.
काकडी मोजिटो - काकडीचे तुकडे, डार्क रम, पुदिना, लिंबाचा रस किंवा तुडे, थोडी साखर या साहित्यापासून काकडी मोजिटो ( Cumber Mojito ) बनवतात. या सर्व गोष्टी बर्फ घालून मिसळा आणि थंड करा. अगदी तयार आहे टेस्टी रिफ्रेश मोजिटो सेवा करा.
जलजीरा - जर तुम्हाला आंबट-तिखट पेय सर्व्ह करायचे असेल तर जलजीरा ( Jaljeera ) हा देखील उत्तम पर्याय आहे. जिऱ्याच्या चवीचे हे पेय पचनासाठी चांगले असते. ते बनवण्यासाठी चिंचेचा कोळ, पुदिन्याची पाने, भाजलेले जिरे, गूळ, काळे मीठ, लिंबाचा रस या साहित्याचा वापर होतो. सर्व गोष्टी थंड पाण्यात मिसळा आणि एक आंबट-तिखट स्वरूपाचे स्वादिष्ट पेय तयार करा.