ETV Bharat / state

गुरुवार ठरला घातवार; विविध सात अपघातात ३९ जणांचा मृत्यू

मुंबई - महाराष्ट्रासह देशभरात आज विविध ठिकाणी सहाहून अधिक अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत एकूण ३९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे देशभरात गुरुवार हा घातवारच ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

गुरुवार ठरला घातवार
गुरुवार ठरला घातवार
author img

By

Published : Feb 20, 2020, 12:13 PM IST

  1. पहिल्या अपघातात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावरील नागाळा-केसला घाट दरम्यान भरधाव स्कॉर्पिओ ट्रकवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
  2. दुसऱ्या अपघातात तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी गावाजवळ भीषण अपघात घडला. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बस केरळ राज्य परिवहन विभागाची आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथून केरळमधील एर्नाकूलम येथे जात असताना या बसचा अपघात झाला.
  3. तिसऱ्या अपघातात पुणे-माणगाव मार्गावर ताम्हणी घाटात कारचा अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार झाडावर जाऊन आदळली. जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  4. चौथ्या अपघातात जम्मू-काश्मीरमधील जम्मू पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील जटवाल (जिल्हा सांबा) येथे कार ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
  5. पाचव्या अपघातात चेन्नईत इंडियन-२ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेटवर क्रेन कोसळल्याने ३ जणांचा मृत्यू झाला असून १० हून अधिक जखमी झाले आहेत.
  6. सहाव्या अपघातात कोल्हापूरच्या तिलारी घाटात 500 फूट खोल दरीत बस कोसळता कोसळता थांबली. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये 40 प्रवासी होते 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मातीच्या ढिगाऱ्यात बस अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
  7. कंटनेरने कारला धडक दिल्याची घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव लगतच्या खडका शिवारत घडली आहे. या भीषण अपघातात कारमधील दोघा जणांचा मृत्यू झाला असून कारचा चुराडा झाला. कंटेनरमधील चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते पुढील तपास करत आहेत.

रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न केले जातात. चालकांना रस्त्यावर बेदकारपणे वाहने चालवू नये, यासाठी फलक लावून आवाहन करण्यात येते. मद्य सेवन करून वाहने चालवणे टाळायला हवे. वाहतुकीचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन केले जाते. मात्र, वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालवताना दिसून येतात. त्यातून कोणाच्या तरी चुकीतून अपघात घडतात. त्यामध्ये स्वत:सह इतरांचा नाहक बळी जातो.

हेही वाचा - देवदर्शनासाठी गेलेल्या वाहनाचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

हेही वाचा - केरळ परिवहन विभागाच्या बसचा तामिळनाडूत भीषण अपघात, २० ठार

हेही वाचा - पुणे-माणगाव मार्गावर ताम्हणी घाटात अपघात; तिघांचा मृत्यू

हेही वाचा - नागपूर-अमरावती महामार्गावर कंटेनर-कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.