मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे गटाने देखील वारंवार खोके सरकार म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. अशातच आता शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या सामनामध्ये शिंदे-फडणवीस सरकारची पहिल्या पानावर जाहिरात छापून आली आहे. सामनातून शिंदे फडणवीसांवर सातत्याने टीका होत असताना आता जाहिरात छापून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या जाहिरातीवरून मनसेने ठाकरे गटाला खोचक सवाल विचारला आहे.
![जाहिरात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16823512_samana.jpg)
संदीप देशपांडे यांचे ट्विट: आपले ट्विटमध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटले की, 'खोके सामना ऑफिसमध्ये पोहोचले का?' असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला आहे. एका बाजूला शिंदे गटासोबत मनसेची वाढती जवळीक आणि शिंदे गटाचे (Shinde group) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विलनीकरण केले जाणार असल्याच्या चर्चा यामुळे संदीप देशपांडे यांच्या अधिक महत्त्व येतं. तर दुसरीकडे जेव्हा भाजपकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटावर एखादी टीका केली जाते त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी होते. मनसेचे नेत्यांकडून देखील त्याच विषयाला अनुसरून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जाते. त्यामुळे आता सामनातील या जाहिरातीमुळे मनसेच्या संदीप देशपांडे यांचे हिट ट्विट चर्चेत आल आहे.
काय आहे जाहिरात?: काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तरुणांना नोकरीचे पत्र देण्यात आले. महाराष्ट्रात देखील 75000 तरुणांना नोकरीचे पत्र देण्यात आले. याचीच जाहिरात आजच्या सामनामध्ये देण्यात आली आहे. या जाहिरातीत 'स्वातंत्र्याची 75 वर्षे, 75 हजार तरुणांना रोजगार देण्याचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती पत्रे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम' अशी जाहिरात देण्यात आली आहे.