ETV Bharat / state

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण भोवणार; 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची चौकशी समितीची शिफारस

author img

By

Published : Aug 29, 2019, 4:38 PM IST

Updated : Aug 29, 2019, 4:45 PM IST

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील (८०) यांनी जानेवारी २०१८ मध्ये मंत्रालयात आत्महत्या केली होती. याप्रकरणी ३ जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे.

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण

मुंबई - संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील (वय ८०) यांनी जानेवारी २०१८ मध्ये मंत्रालयात आत्महत्या केली होती. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. याप्रकरणी ३ जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे.

स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसील अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची समितीने शिफारस केली आहे. या तिघांकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी शिफारस समितीने केली आहे. जानेवारी 2018 मध्ये धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यानंतर माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला आहे.

काय आहे प्रकरण?

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी २०१८ मध्ये मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर उपचार सुरु असताना धर्मा पाटील यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची ५ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, ५ एकराच्या बदल्यात त्यांना केवळ ४ लाख रुपये भरपाई देण्यात आली होती.

धर्मा पाटील यांच्या ४ एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी जवळपास ३ महिने पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या केली होती.

Intro:Body:mh_mum_02_dharma_patil_enquiry_report_script_7204684

धर्मा पाटील आत्महत्या भोवणार
तिघा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची चौकशी समितीची शिफारस

मुंबई : राज्यात खळबळ उडवणारे धुळ्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्या प्रकरणात तीन जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीने शिफारस केली आहे. या प्रकरणात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसील अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्या विरोधात  एफआयआर नोंदवण्याची समितीने शिफारस केली आहे.

या तिघांकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी शिफारस समितीने केली आहे. जानेवारी 2018 मध्ये धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यानंतर माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. यात त्यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.
धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील जवळपास तीन महिन्यांपासून पाठपुरावा केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालयात येऊन विषप्राशन केलं.

Conclusion:
Last Updated : Aug 29, 2019, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.