ETV Bharat / state

मुंबईच्या अर्थव्यवस्थेत धारावीचं मोठं योगदान, पुनर्वसनानंतर येथील लघुउद्योगांचं काय? - धारावीच्या पुनर्वसन

Dharavi Rehabilitation Project : मुंबईच्या एकूण अर्थव्यवस्थेत धारावीचं मोठं योगदान आहे. येथील शेकडो लघुउद्योग अनेक हातांना रोजगार देतात. मात्र आता सरकारनं धारावीच्या पुनर्वसनाचा घाट घातल्यानं या उद्योगांवर गदा येण्याची शक्यता आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 7:56 PM IST

अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी

मुंबई Dharavi Rehabilitation Project : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात मध्य आणि हार्बर रेल्वेपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर धारावी वसलेली आहे. ही झोपडपट्टी जवळपास ५६७ एकरात पसरली असून येथे ६० हजारहून अधिक झोपड्या आहेत. येथे विविध जाती-धर्मांचे अकरा लाखांहून अधिक लोक गुण्यागोविंदानं राहतात.

धारावीच्या पुनर्वसनाचा घाट : मात्र सध्या सरकारनं धारावीचं पुनर्वसन करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पाचं काम उद्योगपती गौतम अदानी यांना देण्यात आलंय. यावरून आता मोठं वादळ निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी धारावी पुनर्वसनाला विरोध केला. शनिवारी शिवसेनेच्या ठाकरे गटानं एक मोर्चा काढत प्रकल्पाला आपला विरोध दर्शविला.

धारावीच्या स्थलांतरणाचा परिणाम मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर : तसं पाहिलं तर धारावीत अनेक लघुउद्योग आहेत. त्यांचं मुंबईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान आहे. यामुळे धारावीच्या स्थलांतरणाचा परिणाम मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. तसेच स्थलांतरानंतर कामगारांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड येऊ शकते. धारावीच्या पुनर्वसनानंतर तेथील लघुउद्योग धोक्यात येतील का? कामगारांच्या हातातील काम जाईल का? धारावीत कुठले आणि किती सुक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय आहेत? मुंबईच्या अर्थव्यवस्थेला धारावीतून कशी चालना मिळते? यावर अर्थतज्ज्ञांची प्रतिक्रिया काय? वाचा या सगळ्याचा लेखाजोखा.

देशातील लेदर मार्केटचं हब धारावी : देशात प. बंगाल, कानपूर इत्यादी ठिकाणी लेदर मार्केट असले तरी, धारावीचं लेदर मार्केट सर्वात मोठं आणि अव्वल दर्जाचं आहे. हे मार्केट मुंबईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतं. या ठिकाणी ५०० ते ६०० छोटी-मोठी लेदरची दुकानं आहेत. या लेदर मार्केटमुळं हजारो लोकांना काम मिळतं. लेदर मार्केटमधील एका दुकानात महिन्याला सुमारे १० ते १५ लाखांची उलाढाल होते. येथून फक्त देशातच नाही, तर परदेशात देखील माल पाठवला जातो.

कोणते आणि किती लघु उद्योग आहेत : धारावीत विविध प्रकारचे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. येथे चामडे बनवणं, कापड उद्योग, पारंपारिक मातीकाम, कचऱ्यावर प्रक्रिया, गारमेंन्टसारखे किमान १५,००० सिंगल रूमचे कारखाने आहेत. याशिवाय पणत्या तयार करणे, इडली बनवून विकणे तसेच पापडाचं पीठ भिजवण्यापर्यंतचे उद्योग धारावीत आहेत. बुट धुवून स्वछ चकाचक करून देणारी देशातील पहिली लाँड्री धारावीत सुरू झाली होती. रंग, दागिने, चिक्की, पापड, चकली, झाडू, प्लास्टिक पुर्नवापर, फरसाण, गोळ्या, बिस्किटं, मातीची मडकी, राख्या, घड्याळाचे पट्टे आदी व्यवसाय धारावीत आहेत. यामुळेच धारावीला मुंबईचं अर्थकेंद्र म्हटल्या जातं.

मुंबईच्या अर्थव्यवस्थेत धारावीचं योगदान काय : मुंबईच्या अर्थव्यवस्थेमध्ये धारावीचं महत्वपूर्ण योगदान आहे. धारावीतील बाजारपेठांमध्ये अनेक परदेशी वस्तू उपलब्ध आहेत. याशिवाय धारावीतून विविध वस्तूंची देश-विदेशात निर्यात केली जाते. याचा महसूल मुंबईला मिळतो. यामुळे धारावीत प्रतिवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. अशाप्रकारे महसूल आणि कर याचा विचार केला तर मुंबईच्या अर्थव्यवस्थेत धारावीचा मोठा हातभार असल्याचं अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितलं.

पुनर्वसनानंतर धारावीतील लघुउद्योग धोक्यात : बिहारच्या सीताबडीतून वयाच्या १५ व्या वर्षी धारावीत आलेले मोहम्मद सुरुवातीला एका लेदर कारखान्यात मजूर म्हणून काम करत असे. आज २५ वर्षांनतर ते एका छोट्या कारखान्याचा मालक झाले आहेत. त्याच्या कारखान्यात सध्या १५ मजूर काम करतात. ते ज्या ठिकाणी काम करतात, तिथेच त्यांचं वास्तव्य आहे. जर यांचं धारावीतून स्थलांतर झालं तर, आमचा पूर्वीसारखा धंदा होणार नाही. यामुळे आमचा लघुउद्योग संकटात येईल, अशी भीती लेदर कारखान्याचे मालक मोहम्मद यांनी व्यक्त केली आहे.

धारावीचं 'सेझ' होईल : सध्या धारावी प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. धारावी ही मुंबईच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे ती मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र धारावी पुनर्वसनावर अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी एक वेगळीच भीती व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकार देशातील अनेक प्रकल्प अदानीना आंदण म्हणून देत आहेत. जर धारावीचं पुनर्वसन गौतम अदानींनी केलं तर आगामी काळात धारावीचं 'सेझ' (Special Economic Zone) होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

धारावीवर अदानींचं वर्चस्व राहील : "भविष्यात धारावीचं 'सेझ' होईल. येथे केवळ अदानींचं वर्चस्व राहील. यानंतर येथे कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. पुनर्वसनाच्या नावाखाली धारावीकरांचं स्थलांतर झालं, तर लघुउद्योगांना व्यवसायच करता येणार नाही. परिणामी धारावीतील अनेक लघुउद्योग नष्ट होतील", अशी भीती अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का :

  1. "ज्यांनी अदानींची सुपारी घेतली, त्यांना ठेचून टाकू", उद्धव ठाकरेंचा धारावी बचाव आंदोलनात इशारा
  2. "एकदा 'ठाकरे डिमांड रुपया' मिळाला की 'यु टर्न' घेण्यास मोकळे", आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.