मुबंई - जगभरात थैमान घातलेल्या कोरानानाचा आता महाराष्ट्रतही प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. दिवसेंदिवस कोरोनोग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. अशा वेळी बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी करणारे कामगार अनेक ठाकाणी कामानिमित्त स्थलांतरित झाले आहे. त्यांना त्यांची गावी यायचे आहे. मात्र, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना आवाहन केले आहे, की आपण आहे तिथेच राहा. कारण आता हालचाल करणे तुमच्यासाठी आणि इतरांसाठी जीवघेणे ठरेल, असे मुंडेंनी म्हटले आहे.
-
माझ्या ऊसतोड बांधवांनो, सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपली फार अडचण होतेय याची मला कल्पना आहे. ऊसतोडणीसाठी इतर जिल्ह्यात गेलेले आपल्यापैकी बरेच जण तिथेच अडकलेत. गावी परतावं अशी तुमची भावना आहे मात्र तुमच्यासह इतरांसाठीही हे जीवघेणे ठरेल. तेव्हा तुम्ही आहात तिथेच रहा. pic.twitter.com/hVAlSJ3h06
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">माझ्या ऊसतोड बांधवांनो, सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपली फार अडचण होतेय याची मला कल्पना आहे. ऊसतोडणीसाठी इतर जिल्ह्यात गेलेले आपल्यापैकी बरेच जण तिथेच अडकलेत. गावी परतावं अशी तुमची भावना आहे मात्र तुमच्यासह इतरांसाठीही हे जीवघेणे ठरेल. तेव्हा तुम्ही आहात तिथेच रहा. pic.twitter.com/hVAlSJ3h06
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 28, 2020माझ्या ऊसतोड बांधवांनो, सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपली फार अडचण होतेय याची मला कल्पना आहे. ऊसतोडणीसाठी इतर जिल्ह्यात गेलेले आपल्यापैकी बरेच जण तिथेच अडकलेत. गावी परतावं अशी तुमची भावना आहे मात्र तुमच्यासह इतरांसाठीही हे जीवघेणे ठरेल. तेव्हा तुम्ही आहात तिथेच रहा. pic.twitter.com/hVAlSJ3h06
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 28, 2020
एक ट्वीट करत त्यांनी हे आवाहन केले आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ऊस तोडणी कामगारांची खूप मोठी अडचण झाली आहे. ऊस तोडणीसाठी गेलेले बरेच कामगार बाहेरच्या जिल्ह्यात अडकले आहेत. मात्र, सद्याची परिस्थिती पाहता त्यांनी आहे तिथेच राहावे, असे आवाहन मुंडेंनी केले आहे.