ETV Bharat / state

सरकारकडून निसर्गप्रेमींचा आवाज घोटण्याचे काम - धनंजय मुंडे

वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी ट्विटरद्वारे सरकारवर जोरदार निशाणा साधला. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेला नष्ट करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या निसर्गप्रेमींचा आवाज घोटण्याचे काम सरकारने केल्याचे मुंडे म्हणाले.

author img

By

Published : Oct 5, 2019, 1:35 PM IST

धनंजय मुंडेंचा सरकारवर निशाणा

मुंबई - वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी ट्वीटरद्वारे सरकारवर जोरदार निशाणा साधला. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेला नष्ट करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या निसर्गप्रेमींचा आवाज घोटण्याचे काम सरकारने केल्याचे मुंडे म्हणाले.

रातोरात ४०० झाडांची पोलीस पहाऱ्यात कत्तल केली. सरकार किती 'आरे'रावी करणार? या सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचे मुंडेंनी म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाने आरेतील कारशेड प्रकरणी सर्व याचिका निकालात काढल्या. त्याला एक दिवसही होत नाही तोच काल (शुक्रवारी) रात्री आरे कॉलनीतील 'मेट्रो रेल प्रोजेक्ट' परिसरातील झाडे रातोरात तोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि काही पर्यावरण प्रेमींनी या परिसरात जोरदार निदर्शने केली. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरेतील वृक्षतोड तत्काळ थाबंवण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. आरेमधील आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून हटवण्यात आले आहे. दरम्यान, आज (शनिवार) सकाळी पोलिसांनी या परिसरात १४४ कलम लावून जमावबंदी केली आहे.

Intro:Body:

nnneee

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.