ETV Bharat / state

सरकारला या जन्मात तरी शेतकऱ्यांचे दु:ख कळणार का? धनंजय मुंडेंचा सवाल

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये मतद करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. दिलेल्या तुटपुंज्या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली.

author img

By

Published : Nov 17, 2019, 6:07 PM IST

Updated : Nov 17, 2019, 7:38 PM IST

धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

मुंबई - परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये मतद करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. दिलेल्या तुटपुंज्या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार असून, सरकारला या जन्मात तरी शेतकऱ्यांचे दुःख कळणार का? असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केला आहे.

mumbai
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. अशातच मा. राज्यपाल महोदयांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रशासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करायला हवे. राज्यपालांनी कोणत्याही निकषाची अट न घालता, सरकारचे नेहमीचे धोरण बाजूला ठेवत शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी असे मत मुंडेंनी व्यक्त केले.

दिलेल्या तुटपुंज्या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार असल्याचे मुंडे म्हणाले. प्रशासनाने कर्जवसूलीस स्थगिती देऊन कर्जमाफी करावी. परीक्षा शुक्ल नव्हे तर संपूर्ण फी माफ करावी. विजेचे बिल माफ करावे तसेच रब्बीची उचल देण्यासाठी तरतूद करावी अशी आमची मागणी असल्याचेही मुंडे म्हणाले.

Intro:Body:

सरकारला या जन्मात तरी शेकऱ्यांचे दु:ख कळणार का? धनंजय मुंडेंचा सवाल

Conclusion:
Last Updated : Nov 17, 2019, 7:38 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.