ETV Bharat / state

Shri SiddhiVinayak Bappa : नववर्षात श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लोटलाय भक्तांचा सागर - नववर्षात श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन

साल २०२३, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबई, ( Shri SiddhiVinayak Bappa ) प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. मुंबईतूनच नाहीत तर राज्यातून, राज्याच्या बाहेरून सुद्धा भाविकांनी काल रात्रीपासून बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. ( Sri Siddhivinayak Bappa in New Year 2023 )

Shri SiddhiVinayak Bappa
नववर्षात श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन
author img

By

Published : Jan 1, 2023, 3:07 PM IST

नववर्षात श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन या वर्षीचा श्री गणेशा करण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी सिद्धिविनायक मंदिरात लोटली आहे. नवीन वर्षाला श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याबरोबर नवीन संकल्प करण्यासाठी लाखो भाविक मंदिरात हजेरी लावतात. ( darshan of Sri Siddhivinayak Bappa ) यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून विशेष तयारी करण्यात आली असून यंदा भाविकांना वर्षाच्या पहिल्या दिवशी क्यू आर कोड शिवाय दर्शन दिले जात आहे, ही जमेची बाजू आहे.

विशेष बंदोबस्त : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने नववर्षाच्या पहिल्या दिवशी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून दर्शनाच्या वेळेतही आज बदल करण्यात आले आहेत. सी सी टीव्ही कॅमेरे, स्क्रिनिंग, स्कॅन मशीन द्वारे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. ही भाविकांची गर्दी रात्री उशिरापर्यंत असणार असल्या कारणाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज दर्शन व आरतीच्या वेळेत केलेले बदल : आज १ जानेवारी साठी दर्शन व आरतीच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पहाटे ३:१५ ते ५:१५ दरम्यान दर्शन, ५:३० ते ६ वेळेत आरती. सकाळी ६ ते११:५५ पर्यंत दर्शन, १२:०५ ते १२:३० या वेळेत श्रींचा नैवेद्य, १२:३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन. ७ ते ७:१० पर्यंत धुपारती, ७:३० ते ८ वाजेपर्यंत आरती, ८ ते ११:३० पर्यंत दर्शन व त्यानंतर ११:५० वाजता शेजारती होईल. दरम्यान रात्री ११:३० वाजता मंगळवार प्रमाणे दोन्ही चेकपोस्ट चे दरवाजे बंद होतील. असे मंदिर न्यासाने जाहीर केले आहे. त्यासोबतच नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी वाढण्याची लक्षात घेऊन रांगेची विशेष व्यवस्था केली गेली असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आव्हान श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने ट्रस्टी राजाराम देशमुख यांनी सांगितले आहे.

चोख बंदोबस्त : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांसाठी गणपती बाप्पाचे दर्शन क्यूआर कोड शिवाय देण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून दर्शनाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ( Bappa Darshan in New Year without QR code ) अलीकडेच सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात आले आहे. यामुळे १४ डिसेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत मंदिर बंद होते. मात्र, आता १९ डिसेंबरपासून मंदिर भविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.