नागपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंप होईल अशी चर्चा आहे. यातून माझी करमणूक होत आहे. सगळे भाकीत पाहून मी पण मनोरंजन होत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
वज्रमूठीला भेगा: महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे हे मला माहीत नाही; मात्र मी वारंवार सांगतो आहे की, जी वज्रमूठ ते सांगत आहेत त्या मुठीला एवढ्या भेगा आहे की, ती कधीही वज्रमूठ होऊ शकत नाही. त्याचाच प्रत्यय आपल्याला येत आहे, असे मत फडणवीसांना मांडले.
तर मी आताच मुख्यमंत्री होणार: मी 2024 मध्ये नाही तर आताच मुख्यमंत्री होईल, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. एका मुलाखतीवेळी अजित पवार यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या विधानानंतर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेच केले आहे.
त्या वक्तव्यावरून हशा पिकला: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2024 मध्ये नाही तर मीच मुख्यमंत्री होईन, असे विधान केले आहे. अजित पवार यांनी एका वृत्तपत्र माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांची आज 'दिलखुला दादा' या आशयाखाली एका वृत्तपत्राने मुलाखत घेतली, त्यावेळी अजित पवार बोलत होते. त्यानंतर अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवतील, अशी चर्चा आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात: बहुमत मिळाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांच्या वक्तव्याची राज्याने दखल घेतली असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते आज जालन्यात आले असता पत्रकाराशी संवाद साधत होते. अजित पवार हे धाडसी नेते आहेत. अजित पवार यांना बहुमत मिळाले तर ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
हेही वाचा: Worker Suicide : मालक दीड वर्षांपासून वेतन देत नव्हता; कामगाराची वखारीतच सुसाईट नोट लिहून आत्महत्या