ETV Bharat / state

Fadnavis On Bhide : भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात स्पष्टोक्ती

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याबाबत अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी करत आहेत. मात्र कोणीही कोणत्याही राष्ट्रपुरुषांची केलेली बदनामी खपवून घेतली जाणार नाही. मग ती सावरकरांची असो की महात्मा गांधींची असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

Devendra Fadnavis Reaction
देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात स्पष्टोक्ती
author img

By

Published : Aug 2, 2023, 3:52 PM IST

मुंबई : संभाजी भिडे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या मागणीनंतर सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्या पुस्तकातील काही उतारे आणि त्यांचे एक भाषण व्हायरल होत असल्याचे सांगितले. त्या भाषणात त्यांनी ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांची बदनामी केल्याचे दिसून येत आहे. मात्र हे भाषण अमरावती जिल्ह्यातील केलेल्या सभेतील नाही ते अन्य ठिकाणचे आहे. त्याबाबतचे आवाजाचे नमुने पोलीस तपासत असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल : संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल त्यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांची चौकशी करून त्यांची वक्तव्ये तपासली जात आहेत. तसेच आवाजाचे नमुने तपासले जात आहेत. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, संभाजी भिडे हे धर्मासाठी कार्य करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी कार्य करतात.बहुजनांना शिवरायांचा इतिहास समजावा म्हणून कार्य करतात. त्यासंदर्भात त्यांचे कार्य चांगले असल्याचा दाखला फडणवीस यांनी दिला. मात्र जर त्यांनी आक्षपार्ह वक्तव्य केले असेल तर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.

संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात : मनोहर कुलकर्णी यांचा वारंवार संभाजी भिडे गुरुजी असा उल्लेख देवेंद्र फडणवीस हे करत होते. यावर पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला. अशा व्यक्तीला गुरुजी संबोधने योग्य नाही, ते गुरुजी आहेत याचा पुरावा आहे का? असे पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारले. यासंदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्हाला पृथ्वीराज बाबा म्हणतात आता तुम्हाला बाबा का म्हणतात याचा काही पुरावा आहे का? त्यामुळे गुरुजी म्हणतात याचा पुरावा काय हवा आहे. ते आम्हाला गुरुजी वाटतात म्हणून आम्ही गुरुजी म्हणतो, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. यामुळे सभागृहामध्ये एकच गदारोळ झाला. विरोधकांना यावेळी बोलू न दिल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला.

हेही वाचा -

  1. MIM On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचा पाय कापणाऱ्यास दोन लाख; एमआयएम नेत्याकडून बक्षीस जाहीर
  2. Maharashtra Monsoon Session 2023: संभाजी भिडेंवर कारवाई करा, विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी करत आंदोलन
  3. sambhaji bhide : संभाजी भिडे विरोधात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा मूक मोर्चा; तर चाकणकर यांचे फडणवीस यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.