ETV Bharat / state

Devendra Fadnavis : 'द काश्मिर फाइल्स' बद्दल टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Nov 29, 2022, 6:50 PM IST

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत प्रतिक्रिया ( Devendra Fadnavis on The Kashmir Files ) व्यक्त केली. ते म्हणाले की, संशोधनानंतरच  द काश्मीर फाइल्स ( The Kashmir Files ) या चित्रपटात सत्य दाखवण्यात आले होते. भारताच्या सेन्सॉर बोर्डाने त्याला मान्यता दिली. चित्रपटाबद्दल अशी टीका करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले. फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी मंचावर बोलताना विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर टीका केली होती.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुखांनी काश्मिर फाइल्स चित्रपटावर टीका केली होती. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत प्रतिक्रिया ( Devendra Fadnavis on The Kashmir Files ) व्यक्त केली. ते म्हणाले की, संशोधनानंतरच द काश्मीर फाइल्स ( The Kashmir Files ) या चित्रपटात सत्य दाखवण्यात आले होते. भारताच्या सेन्सॉर बोर्डाने त्याला मान्यता दिली. चित्रपटाबद्दल अशी टीका करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले.

इफ्फीच्या ज्युरी प्रमुखांनी केली होती टीका - गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सोमवारी (28 नोव्हेंबर) सांगता झाली. या फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी मंचावर बोलताना विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर टीका केली होती. या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव यांनी द काश्मीर फाइल्सला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असे म्हटले होते. आम्ही सर्वजण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिल्यानंतर नाराज आणि आश्चर्यचकीत झालो होतो. हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरे काही वाटले नाही. हा चित्रपट असभ्य होता आणि त्याची कथाही कमकुवत होती. एवढ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे, असे ते फेस्टिवल दरम्यान मंचावर बोलताना म्हणाले होते.

इफ्फी महोत्सवात द काश्मिर फाइल्स - गेल्या आठवड्यात या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट दाखवण्यात आला होता. विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट या वर्षी 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरे जा, हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे.

जनता पंतप्रधान मोदींना मसिहा मानते - पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कोणीही असे म्हटल्याने कोणीही 'रावण' होऊ शकत नाही. देशातील जनता पंतप्रधान मोदींना 'मसिहा' मानते. जेव्हा-जेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींवर शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी निवडणुकीत अनामत रक्कम गमावली. जेवढ्या शिव्या देतील, तेवढे खाली येतील, असेही फडवणीस म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.