मुंबई Devendra Fadnavis On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते अजित पवार सध्या नाराज असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून केले जात आहेत. मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा मनी बाळगणाऱ्या अजित पवार यांना संधी भेटेल, तेव्हा 5 वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्याचबरोबर पुढील विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. सहा महिन्यासाठी कुठल्याही गोष्टी बदलत नसतात, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबईत एका विशेष कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या समर्थकांसह शिंदे - फडणवीस सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल्याच्या चर्चांना जोर आला आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सहा महिन्यासाठी कुठल्याही गोष्टी बदलत नसतात. या कारणानं महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट करत अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम दिला आहे. तर दुसरीकडं अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचं असेल, तर त्यांना पूर्णकाळ काळ 5 वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू, यापुढं जेव्हा कधी संधी भेटेल तेव्हा, त्यांना मुख्यमंत्री करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवारांची : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं आम्हाला धोका दिला होता. त्यादरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांची होती. तेव्हा भाजपाशी संबंध ताणले गेल्यानं शिवसेनेने, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू केली होती. आपण मुख्यमंत्री व्हावं, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं होतं. त्या दरम्यान राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडं युतीचा प्रस्ताव पाठवत आम्हाला तीन पक्षाचं सरकार नको आहे. आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत असा प्रस्ताव दिला होता, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न भेटल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत शिवसेनेनं केलेली मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपकडून मान्य न झाल्यानं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत कुठल्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता येत नसल्यानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.
राष्ट्रवादीचे पत्र माझ्याच घरी केले टाईप : राष्ट्रपती राजवट लागू करण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जातं. त्या पद्धतीचं पत्रही त्यांना दिलं जातं. अशाच पद्धतीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसलाही देण्यात आलं होतं. याप्रसंगी आम्ही सरकार बनवणार नाही, असं राष्ट्रवादीचं पत्र माझ्याच घरी टाईप केल्याचा खुलासाही देवेंद्र फडवणीस यांनी केला आहे. या पत्रामध्ये शरद पवार यांनी दुरुस्ती करत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची जबाबदारी ही माझ्याबरोबर अजित पवार यांच्यावर टाकण्यात आली होती, असंही देवेंद्र फडवणीस म्हणाले. इतकेच नाही, तर मंत्र्यांच्या खात्याची यादी तयार करण्याबरोबर जिल्ह्यापासूनच्या सर्व गोष्टी ठरवल्या गेल्या होत्या. यादरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचंही ठरलं, त्यानुसारच राष्ट्रपती राजवट लागू केली. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा निर्णय बदलला. हे योग्य केलं नाही, असं अजित पवारांना वाटलं आणि म्हणूनच अजित पवार आमच्याबरोबर आले, असंही देवेंद्र फडवणीस म्हणाले. यामुळे एका दिवशी भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून माझा आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. परंतु हा शपथविधी जास्त काळ टिकला नाही. अजित पवार लगेच माघारी फिरले, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :