ETV Bharat / state

दिशाहीन सरकारला अद्याप सूर गवसला नाही, फडणवीसांची बोचरी टीका

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या अधिवेशनात जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली.

Devendra Fadnavis criticism on Maha Vikas aghadi'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 23, 2020, 5:25 PM IST

Updated : Feb 23, 2020, 6:26 PM IST

मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून (सोमवार) सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अद्याप या सरकारला सूर गवसला नसून, त्यांची दिशाही ठरलेली नाही. हे सरकार गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच सरकारने अगोदर आपसात चहापान करून ताळमेळ बनवावा, व नंतर आम्हाला चहापानाला बोलवावे, असेही फडणवीस म्हणाले.

भाजप नेत्यांची आणि आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या अधिवेशनाचा पार्श्वभूमीवर महिला विकास मंडळ, कुलाबा येथे बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक इत्यादी नेते उपस्थित होते.

फडणवीसांची सरकारवर बोचरी टीका

अधिवेशनात महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन जनतेचे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीवरून घुमजाव घातले आहे. आम्ही ज्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अटी लावल्या होत्या, त्यापेक्षा जाचक अटी या सरकारने लावल्या आहेत. शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडल्याने अत्यंत नुकसान झाले आहे. त्या मुद्यावरुन आम्ही आवाज उठवणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही

कृषी शेतकरी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना असणारा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे. त्याबाबत आवाज उठवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. महिलांवरील अत्याचाराबाबत आम्हाला राजकारण करायचे नाही. पण सरकार या मुद्यावर गंभीर नाही. पोलिसांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा वॉटर ग्रीड प्रश्न, ग्राम सडक योजनेला दिलेली स्थगिती, जलयुक्त शिवार योजनेला दिलेली स्थगिती यावर आवाज उठवणार आहे. जलयुक्त शिवारला नवीन नाव देउन ती पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फडणवीस यांनी २ निर्णयामुळे अभिनंदन केले. एक एलगार परिषदेचा तपास एनआयकडे (NIA) दिल्याबद्दल, दुसरे सीएए (CAA) व एनपीआर (NPR) ला पाठिंबा दिल्याबद्दल. प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, याचे पुरावे काँग्रेस मागते आहे. दुसरीकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे शिवसेना मागत आहे. स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान करणारी काँग्रेस शिवसेनेला चालते का? असा सवाल फडणवीस यांनी केला. 26 तारखेला सावरकरांचा गौरव विधिमंडळात झाला पाहिजे ही आमची मागणी असणार आहे. वारीस पठाण यांच्या वादग्रस्त विधानाने हिंदू समाजाला अपमानीत करण्याचा प्रकार कोणी करू नये. यावर आम्ही शांत बसणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

बाबरी मस्जिद व्हावी यासाठी पवार आग्रही का?

सीएए मध्ये नागरिकता भेटणार आहे ती जाणार नाही. एनपीआरची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारच्या ज्या पद्धतीने भूमिका बदलत आहेत, त्या अनुषंगाने आम्हाला सरकारच्या चहापान कार्यक्रमाला जायचे नाही. आम्ही सर्व चौकशीसाठी तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. वृक्ष लागवडीचे अत्यंत महत्वाचे काम आमच्या काळात झाले आहे. जलआयुक्त शिवारातही महत्वाचे काम झाले आहे. 1999 पासून 2015 पर्यंत अर्थपूर्ण श्वेतपत्रिका काढावी ही आमची सुद्धा मागणी आहे. प्रत्येक 5 वर्षाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. बाबरी मस्जिद व्हावी यासाठी शरद पवार आग्रही का आहेत? हे आम्हाला समजत नसल्याचे फडणवीस म्हणाले. अल्पसंख्याकांसाठी मतांचे राजकारण होत आहे. सरपंचाच्या थेट निवडणूका झाल्या तर त्याचा फायदा भाजपला होईल हे सरकारला माहीत आहे, म्हणून निवडणुका रद्द करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

Last Updated : Feb 23, 2020, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.