ETV Bharat / state

Devendra Fadnavis : ड्रग्स माफियाला कोणाचा पाठिंबा? ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा - उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

Devendra Fadnavis On Lalit Patil : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी केली नसल्याचा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळं आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis On Lalit Patil
Devendra Fadnavis On Lalit Patil
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 5:43 PM IST

मुंबई : Devendra Fadnavis On Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात नवा खुलासा केलाय. ललित पाटील शिवसेना नाशिक शहरप्रमुख असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. याशिवाय ललित पाटील याची 14 दिवसात एकही चौकशी न केल्यानं फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ते शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणात सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ललित पाटीलनं ससून रुग्णालयातून आपल्याला पळवून लावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं विरोधकांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री दादा भुसे यांच्या चौकशीची मागणी केलीय. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहरप्रमुख असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. शिवाय याप्रकरणी फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार करत निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंवर कोणाचा दबाव होता? : यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ललित पाटीलला 10 डिसेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याला नाशिक शिवसेनेचं प्रमुख केलं. अटकेनंतर ललित पाटील याने पीसीआर मागितला होता. गुन्हा मोठा असल्यानं 14 दिवसांचा पीसीआर मिळाला. पीसीआर मिळताच त्याला ससूनमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, त्यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला नाही. तसंच त्याची चौकशीही झाली नाही. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलची चौकशी का केली नाही? असा सवाल फडणवीस यांनी विचारलाय. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर कोणाचा दबाव होता? ललित पाटलाचे कोणाशी संबंध होते? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ललित पाटीलच्या पाठीशी कोण? : या प्रकरणात, मी तोंड उघडलं, तर अनेकांची तोंड बंद होतील, असं यापूर्वी सांगितलं होतं. या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून होत आहे. अशात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात अजून नवनवीन खुलासे करणार असल्यानं नक्की या प्रकरणात कोणाचा हात आहे? ललित पाटीलला कोण पाठीशी घालत होतं? तसंच तो नाशिक शिवसेना प्रमुख असल्यानं त्याची चौकशी झाली नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis on contract Recruitment: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
  2. Sanjay Raut On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूची माणसं नशेच्या बाजारात, आमदारांना मिळतोय लाखोंचा हप्ता
  3. Sasoon Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जातानाचा CCTV समोर; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.