ETV Bharat / state

'आरोग्य सेतू'ॲपने कधी दिला दिलासा तर कधी वाढवली डोकेदुखी! - आरोग्य सेतू अ‌ॅप माहिती

केंद्र सरकारने नागरिकांना लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'आरोग्य सेतू' अ‌ॅपची निर्मिती केली. देशभरात सरकारी कर्मचारी व कोरोनाच्या चाचण्या झालेल्यांपैकी १४ कोटी ५६ लाखांहून अधिक नागरिक आरोग्य सेतू या मोबाईल अ‌ॅपचे वापरकर्ते आहेत. राज्यात ही संख्या १ कोटी ७५ लाख इतकी आहे. यापैकी केवळ २ लाख ३ हजार ७६४ जणांनीच या अ‌ॅपवर आपला प्रतिसाद आणि माहिती नोंदवली आहे. हे मोबाईल अ‌ॅप कोरोनाची माहिती देताना नागरिकांसाठी कधी दिलासा देणारे तर कधी डोकेदुखी वाढवणारे ठरत असल्याचे दिसून आले आहे.

Aarogya Setu
आरोग्य सेतू
author img

By

Published : Jul 26, 2020, 3:31 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने कोविड-१९ म्हणजेच कोरोना या साथरोगाची माहिती देण्यासाठी आणि बाधा झालेल्या व्यक्तींना लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'आरोग्य सेतू' अ‌ॅपची निर्मिती केली. हे मोबाईल अ‌ॅप कोरोनाची माहिती देताना नागरिकांसाठी कधी दिलासा देणारे तर कधी डोकेदुखी वाढवणारे ठरत असल्याचे दिसून आले आहे.

'आरोग्य सेतू'ॲपने कधी दिला दिलासा तर कधी वाढवली डोकेदुखी

देशभरात सरकारी कर्मचारी व कोरोनाच्या चाचण्या झालेल्यांपैकी १४ कोटी ५६ लाखांहून अधिक नागरिक आरोग्य सेतू या मोबाईल अ‌ॅपचे वापरकर्ते आहेत. राज्यात ही संख्या १ कोटी ७५ लाख इतकी आहे. यापैकी केवळ २ लाख ३ हजार ७६४ जणांनीच या अ‌ॅपवर आपला प्रतिसाद आणि माहिती नोंदवली आहे. या अ‌ॅपच्या मदतीने कोरोनाची लक्षणे असलेल्या ७ लाख ४१ हजार नागरिकांना ब्लूटूथ कॉन्टॅक्टच्या माध्यमातून शोधून काढण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. ज्या वापरकर्त्यांनी आपली माहिती नोंदवली त्यातील बहुसंख्य नागरिकांना याचा फायदा झाल्याचे सांगितले आहे. तर, अनेकांनी याबाबत तक्रारीही नोंदवल्या आहेत. आवश्यकता असतानाही विमान प्रवास करताना अ‌ॅपमधील हिरव्या रंगाचे सिग्नल वेळेत मिळत नसल्याने, त्रास होत असल्याचेही अनेकांनी सांगितले. अनेकांना हे अ‌ॅप वापरताना शासकीय यंत्रणेचे खूप फोन येत असल्याच्याही तक्रारी नोंदवल्या आहेत.

आरोग्य सेतू अ‌ॅपमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांक आणि खासगी दूरध्वनीच्या माध्यमातून नागरिकांना शोधण्यासाठी टेलिफोन सर्व्हिलन्स नावाचे ऑप्शन आहे. त्याचा वापर आरोग्य विभागाकडून केला जातो. त्याआधारे कालपर्यंत ९५ हजारांहून अधिक नागरिकांना संपर्क करण्यात आला आणि त्यांचा फिडबॅक घेण्यात आला. हे अ‌ॅप अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देते. त्यात एकाच वेळी राज्यात असलेल्या लॅबची रोडमॅपनुसार माहिती मिळते. पीएम फंडात एखाद्या व्यक्तीला निधी द्यायचा असेल, तर त्याचाही पर्याय यात ठेवण्यात आला असल्याची माहिती या अ‌ॅपचे राज्यात काम पाहणारे मुख्य अधिकारी डॉ. विजय कंदेवाड यांनी दिली.

राज्यात शहरी भागाचा अपवाद सोडला तर या अ‌ॅपसंदर्भात ग्रामीण भागात अजूनही जनजागृती होऊ शकली नाही. अ‌ॅपमधील ब्लुटूथवर चालणाऱ्या यंत्रणेवर सर्व काही अवलंबून असल्याने अनेकदा अडचणी येतात. आरोग्य सेतू अ‌ॅपवरील माहिती ही केवळ आपल्याच नव्हे तर आपण राहत असलेल्या परिसराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे. आपण एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलो आहोत काय? याचे अलर्ट आणि माहिती अ‌ॅप देत असल्याचे ते नागरिकांच्या फायद्याचेच आहे, असे डॉ. कंदेवाड यांनी सांगितले.

असे चालते अ‌ॅपचे काम -

कोरोना आणि त्यासाठी नेमकी खबरदारी घेण्यासाठी सल्ला देण्याचे काम अ‌ॅप करते. क्वारंटाईन सेंटर व उपचार कुठे‍ घेऊ शकता याचीही माहिती मिळते. सेल्फ असेसमेंट नावाचे एक टूल असून त्यात आपण आपली माहिती भरणे बंधनकारक असते. ही माहिती सुरक्षित असते, असा दावा केला जात आहे. याच माहितीच्या आधारे संपर्क टूलमधून वापरकर्त्यांची सद्य:स्थिती काय आहे, त्याच्यापासून किती धोका आहे, याची माहिती शासकीय यंत्रणेला दिली जाते.

ब्लुटूथ टूलची सर्वात मोठी अडचण -

आरोग्य सेतू अ‌ॅप हे पूर्णपणे ब्लुटूथ कॉन्टॅक्टच्या माध्यमातून कार्यरत होत असते. हे अ‌ॅप सुरू करताच मोबाईलमधील ब्लुटूथ सुरू होते, आणि आजूबाजूच्या परिसरता असलेली रुग्णांची, विभागातील‍ परिस्थितीची माहिती मिळते. एखादा व्यक्ती पॉझिटीव्ह असताना तो इतरांच्या संपर्कात आल्यास त्याचीही लगेच सूचना मिळते. मात्र, यासाठी हे अ‌ॅप कायम सुरू असले पाहिजे, अन्यथा माहिती मिळू शकत नाही, ही या अ‌ॅपमधील सर्वात मोठी कमतरता असल्याचेही सांगण्यात आले.

अशी होते माहिती गोळा -

आरोग्य सेतू अ‌ॅपचे वापरकर्ते अथवा नवीन कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याची प्रमुख जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱयांना देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांच्या डॅशबोर्डवर ही माहिती गोळा केली जाते. त्यानंतर त्यांच्याकडून ही माहिती एनआयसीच्या डॅशबोर्डवर आणि शेवटी अ‌ॅपच्या सर्व्हवर येते. राज्यात १ कोटी ७५ लाख नागरिकांनी हे अ‌ॅप डाऊलोड केलेले असले तरी केवळ २ लाख नागरिकांनी त्यावर माहिती भरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.