ETV Bharat / state

तंत्रज्ञानामुळे लहान मोठ्यांना पंतगबाजीचा विसर; मकर संक्रात असूनही मागणी घटली

मकर संक्रातीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते. आकाशात उंच उंच पतंग उडविणे हा मुलांचा आवडता खेळ. मात्र, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पतंग आकाशात न उडता दुकानात लटकल्याची दृश्य प्रत्येक दुकानात दिसत आहे. दादर येथील पतंगांच्या दुकानात विविध पतंगी विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, खरेदीसाठी ग्राहकच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

mumbai
पतंग
author img

By

Published : Jan 14, 2020, 9:07 AM IST

मुंबई - विसाव्या शतकात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली. मात्र, या ओघात अनेक गोष्टी नामशेष होताना दिसत आहेत. ९० च्या दशकात खेळले जाणारे भवरा, विटी दांडू इतकेच नव्हे तर, पतंगबाजीचा देखील लहान मोठ्यांना विसर पडल्याचे चित्र आहे. मकर संक्रांतीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना पतंग विक्रीच्या दुकाने ओस पडल्याचे दिसून येत आहे.

मकरसंक्रांती निमित्त पतंगीच्या विक्रीबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

मकर संक्रातीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते. आकाशात उंच उंच पतंग उडविणे हा मुलांचा आवडता खेळ. मात्र, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पतंग आकाशात न उडता दुकानात लटकल्याची दृश्य दिसत आहे. दादर येथील पतंगांच्या दुकानात विविध पतंगी विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, खरेदीसाठी ग्राहकच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मकरसंक्रात आली की लहान मुलांची पतंग विक्रेत्यांच्या दुकानात झुंबड उडायची. दुकानातून पतंग आणि मांजा खरेदी करून पतंग कापण्याची चुरस लागायची. तर, काही ठिकाणी पतंग महोत्सव भरायचे. मात्र, काळानुरूप हळूहळू हे प्रमाण कमी झाले आहे.

आजचे युग हे मोबाईलचे युग आहे. तरी देखील पतंगप्रेमींसाठी वर्षानुवर्षे पतंग विकणाऱ्या दुकानात विविध प्रकारचे विविध आकारातील पतंगी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कागदाच्या त्याचप्रमाणे मेटालिक पेपरमध्ये बनविण्यात आलेल्या पतंगी, कार्टूनचे चित्र असलेल्या पतंगी, सिनेकलाकारांचे फोटो असलेल्या पतंगी देखील उपलब्ध आहेत. मात्र, तरी देखील लोकांनी या पतंगांकडे पाठ फिरवली आहे.

पतंगावार राजकारण्यांची क्रेज कायम

दरवर्षी होणाऱ्या घडामोडींना अनुसरून देखील पंतगी बनवण्यात येतात. सिने जगतातील लोकांचे चेहरे असणाऱ्या पंतगी बनवण्यात येतात. त्याचबरोबर, राजकारणी व्यक्तींची फोटो असणाऱ्या पंतगींना देखील मोठी मागणी असते. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा फोटो असेलेल्या पंतगी बाजारात विक्रीला आल्या आहेत. राहुल गांधी यांची प्रतिमा असलेली पंतगीही विक्रीस ठेवलेली आहेत.

लहान मुलांना पतंग उडविणे सोपे जावे यासाठी कनी बांधलेले पतंगसुद्धा उपलब्ध आहेत. पतंगीच्या किंमती १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत साईजनुसार उपलब्ध आहेत. तर बदामी, गुलाबी, पांढरा, सुरती, अहमदाबादी फिरकी मांजा ६० रुपयांपासून ते ६०० रुपये किंमतीपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच पतंग कापणारी फिरकी ३०० ते ३५० रुपयांना मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे.

हेही वाचा- 'तारापूर स्फोटाची सखोल चौकशी करा' मुख्यमत्र्यांनी दिला आदेश

Intro:मुंबई
विसाव्या शतकात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली. मात्र या ओघात अनेक गोष्टी नामशेष होताना दिसत आहेत. 90 च्या दशकात खेळले जाणारे भवरा, विटी दांडू इतकेच नव्हे तर पतंगीबाजीचा देखील विसर पडला आहे. मकर संक्रांतीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना पतंगाची दुकाने मात्र ओस पडली आहेत. Body:मकर संक्रातीनिमित्त पतंग ही मोठ्या प्रमाणात उडवली जाते. या निम्मित दादर येथील पतंगांच्या दुकानात विविध पतंगी विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र खरेदीसाठी ग्राहकच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आकाशात उंच पतंग उडविणे म्हणजे मुलांचा आवडीचा खेळ. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पतंग मात्र आकाशात न उडता दुकानात लटकल्याची दृश्य प्रत्येक दुकानात दिसत आहे.

मकर संक्रात आली की लहान मुलांची पतंग खरेदीसाठी पतंग विक्रेत्याच्या दुकानात झुंबड उडायची. दुकानातून पतंग आणि मांजा खरेदी करून पतंग कापण्याची चुरस लागायची तर काही ठिकाणी पतंग महोत्सव भरायचे मात्र काळानुरूप हळूहळू हे प्रमाण झाले आहे.

आज मोबाईलचे युग असले तरी देखील पतंगप्रेमीसाठी वर्षोनुवर्षे पतंग विकणाऱ्या दुकानात विविध प्रकारचे विविध आकारातील पतंग विक्रीसाठी ठेवण्यात आहेत. कागदाच्या त्याचप्रमाणे मेटालिक पेपर मध्ये बनविण्यात आलेल्या पतंगी, कार्टूनचे चित्र असलेले पतंगी, सिनेकलाकारांचे फोटो असलेल्या पतंगी आहेत.

पतंगावार राजकारण्यांची क्रेज कायम

दरवर्षी होणाऱ्या घडामोडीना अनुसरून देखील पंतगी बनवण्यात येतात. ज्या प्रकारे सिने जगतातील लोकांचे चेहरा असणाऱ्या पंतगी बनवण्यात येतात त्यात राजकारणी व्यक्तीची ही फोटो असणाऱ्या पंतगीना मोठी मागणी असते. यावेळी प्रतप्रधान मोदी यांचा फोटो असेलेल्या पंतगी बाजारात आहे. राहुल गांधी यांचीही प्रतिमा असलेली पंतगी ही विक्रीस ठेवली आहे.

लहान मुलांना पतंग उडविणे सोपे जावे यासाठी कनी बांधलेले पतंग सुद्धा उपलब्ध असून पतंगीच्या किंमती 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत साईज नुसार उपलब्ध आहेत

तर बदामी, गुलाबी, पांढरा, सुरती, अहमदाबादी फिरकी मांजा 60 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत आहे.तसेच पतंग कापणारी फिरकी 300 ते 350 रुपयांना मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

बाईट

किरण माळी, पतंग विक्रेता

राजू वैश्य,देवयानी काईट सेंटर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.