ETV Bharat / state

कोचिंग क्लासचालकांनी ठोठावला राज ठाकरेंचा दरवाजा

मार्च महिन्यात देशात कोरोनाने शिरकाव करत धुमाकूळ घातला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वात प्रथम शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले होते. त्यामुळे आता राज्यातील हजारो कोचिंग क्लासचालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

Raj Thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Nov 2, 2020, 1:20 PM IST

Updated : Nov 2, 2020, 2:55 PM IST

मुंबई - कोरोनाची चाहूल लागताच शासनाने सर्व प्रथम शाळा बंद केल्या. सामाजिक बांधिलकी जपत आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्याच वेळेस कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. तेव्हापासून क्लासेसच्या संचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता अनलॉक सुरू झाले असले तरीही कोचिंग क्लास सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे कोचिंग क्लासेसच्या चालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे दार ठोठावले आहे. कोचिंग क्लास चालकांचे आणि पालकांचे एक शिष्टमंडळ राज यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानावर दाखल झाले. राज ठाकरे यांनी त्यांचे निवेदन स्विकारत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

हजारो क्लास चालक संकटात -

महाराष्ट्रात जवळपास ५० हजार लहान-मोठे कोचिंग क्लासेस आहेत. त्यावर ५ लाख शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु लॉकडाऊनमुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या तरुणांनी क्लासेससाठी भाड्याने गाळे घेतले आहेत, त्यांचे भाडे थकले आहे. काही संचालकांची घरे आणि क्लासेस दोन्ही भाड्याच्या जागेत आहेत. त्याचे पैसे कसे भरायचे, हा प्रश्न या क्लासेस संचालकांसमोर उभा राहिला आहे.

शासनाने आर्थिक सहाय्य करावे -

क्लासेस सुरू करण्यास परवानगी मिळेल की, नाही या सर्व विवंचनेने क्लासेस संचालक आत्महत्येस प्रवृत्त होतील, अशी भीती निर्माण झाली आहे. शासनाच्या दृष्टीने कोचिंग क्लासेस हा घटक कायम दुर्लक्षित राहिला आहे. क्लासेस संचालक हे शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याचे काम करतात. याचा शासनाने विचार करावा आणि क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांना आर्थिक सहाय्य करावे. इतर व्यवसायांप्रमाणे क्लासेस घेण्यास सशर्त परवानगी द्यावी, अशी विनंती कोचिंग क्लासेस संघटनेच्यावतीने काही दिवसांपूर्वी सरकारकडे करण्यात आली होती.

राज ठाकरेंना आतापर्यंत कोण-कोण भेटले?

अनलॉक सुरू झाल्यापासून अनेक संस्था आणि व्यवसायांशी संबंधित लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत मदतीची विनंती केली आहे. आतापर्यंत डॉक्टर, कोळी समाजाच्याच्या महिला, जिम मालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले, पुजारी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ज्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यापैकी बर्‍याच जणांच्या समस्यांचे निराकरण झाल्याने लोकांचा राज ठाकरेंवरील विश्वास वाढला आहे.

Last Updated : Nov 2, 2020, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.