मुंबई - मृत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आणखी एकाला अटक केली आहे. ड्रग्स प्रकरणात एनसीबीने सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंतला याला अटक केली आहे. यापूर्वी शुक्रवारी सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने अटक केली होती.
आतापर्यंत एनसीबीने या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. यातील तीन शोविक, सॅम्युअल आणि झैद हे रिमांडवर आहेत. आता शनिवारी एजन्सीने दीपेश सावत यांना अटक केली आहे. शुक्रवारी त्याची चौकशी करण्यात आली. दीपेशचे निवेदन एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 नुसार नोंदवले गेले होते. यानंतर त्याला आज (शनिवारी) एनडीपीएस कायद्यांतर्गतच अटक करण्यात आली आहे.
एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले की, दीपेश सावंत यांना ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. शोविक आणि सॅम्युअल मिरांडाने दिलेल्या माहितीनुसार आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली गेली आहे.
दीपेश सावंत कोण?
सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली त्यावेळी तो चार लोकांसह घरी राहत होता. त्यातून नीरज सिंग, कूक केशव बनवा, जो गेल्या दीड वर्षांपासून सुशांतसिंह राजपूतशी संबंधित होता. तिसरा व्यक्ती म्हणजे दीपेश सावंत. तर चौथा सदस्याचे नाव सिद्धार्थ पिठाणी आहे.