ETV Bharat / state

Kharghar Death case: श्री सेवकांच्या मृत्यूप्रकरणी प्रश्नचिन्ह कायम, सरकारमधील मंत्र्यांकडून सारवासारवीचे प्रयत्न सुरू - Kharghar Death case

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान उष्माघातानं मृत पावलेल्यांचा आकडा वाढत असल्याने सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच सरकारच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना सरकारची बाजू सावरण्याचे काम आता मंत्रीही करू लागले आहेत. निसर्गाचा प्रकोप झाल्याने ही दुर्घटना घटली असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

Death cases of Kharghar Shri Sevak
खारघर श्री सेवकांच्या मृत्यूप्रकरण
author img

By

Published : Apr 21, 2023, 10:08 AM IST

निसर्गाचा प्रकोप झाल्याचं मंत्री केसरकरांचे विधान..

मुंबई: खारघर येथे मागच्या रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी उष्माघाताने १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. यावरून राजकारण तापलं असताना सरकारने आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती घोषित केली आहे. ही समिती एका महिन्याच्या आत या संदर्भात अहवाल सादर करणार आहे.

श्री सेवकांच्या आग्रहास्तव कार्यक्रम दुपारी: मागच्या रविवारी खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत पावलेल्यांचा आकडा वाढत असल्याने सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची उच्च स्तरातून निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची या प्रकरणी चौकशीसाठी नियुक्ती केल्याने विरोधक नाराज झाले आहेत.

सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न : दरम्यान, या घटनेवर बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा कार्यक्रम सायंकाळी घेण्यात यावा अशी इच्छा प्रकट केली होती. परंतु श्री सेवकांना कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी जाण्यास फार उशीर होईल, तसेच कार्यक्रम जरी सायंकाळी ठेवला तरीसुद्धा श्री सेवक सकाळपासूनच येऊन कार्यक्रमस्थळी बसतील. म्हणूनच श्री सेवकांच्या आग्रहास्तव कार्यक्रम दुपारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हे सर्व शिस्तबद्ध श्रीसेवक आहेत. ते जिथे जातात तेव्हा सोबत जेवणाचे डब्बे आणि पाण्याच्या बाटल्याही घेऊन जातात. इथे सुद्धा त्यांनी स्वतःचे डब्बे व पाण्याच्या बाटल्या बाळगल्या होत्या. पण, निसर्गाचाच प्रकोप झाला. पंढरपुर वारीलाही लाखो भक्तजन जातात तेथेही अशा पद्धतीच्या घटना होत असतात, असे सांगत श्रीसेवकांना त्यांच्या देवाचे दर्शन घ्यायचे होते, हीच त्यांची इच्छा होती. तसेच मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची फौज तैनात करूनही अशी दुर्घटना घडली हे दुर्दैव असल्याचे सांगत, केसरकरांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

दुर्घटनेतील मृतांचा खरा आकडा सरकार लपवतंय?: सर्व प्रकरणावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी श्री सेवकांच्या पोटामध्ये अन्न नव्हते, ते सात ते आठ तास अन्न पाणी शिवाय रिकाम्या पोटी होते, अशी माहिती पोस्टमार्टेम रिपोर्ट मध्ये आल्याचे सांगितले आहे. रोहा, माणगाव, श्रीवर्धन, उरण, म्हसाळा, अलिबाग या भागात श्री सेवकांची संख्या मोठी असून तेथील काही श्री सेवक त्यांना भेटले व या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ५० ते ७५ श्री सेवकांचा असल्याचे सांगितले आहे. परंतु खोके सरकार हा आकडा लपवत असल्याचे सांगत सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचेही म्हटले आहे.

अनेक प्रश्न उपस्थित?: मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठोपाठ मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा हवामानात झालेल्या बदलामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगत सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या दुर्घटनेनंतर या कार्यक्रमाच्या आयोजणावरच अनेक प्रश्न उपस्थित होतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीच वेळ उपलब्ध होती म्हणून कार्यक्रम त्या वेळेत घेण्यात आला असे सांगितले जात आहे. याच्या आयोजनावर १४ कोटी रुपये खर्च केले असताना तंबू व पाण्याची व्यवस्था का करण्यात आली नाही? पाहुणे व वरिष्ठ नेत्यांना कुलर, पंखे पण जनतेला साधा तंबू सुद्धा नाही. पुरस्कार वितरण कार्यक्रम बंदिस्त सभागृहात आयोजित करायला हवा होता. गर्दीचे नियोजन व्यवस्थित करायला हवे होते. असे अनेक प्रश्न विरोधकच नाही तर सामान्य जनतेकडून विचारले जात आहे. याबाबत स्थापन करण्यात आलेली एक सदस्यीय समिती कितपत चौकशी करू शकते हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. परंतु सत्ताधारी नेते मात्र सरकारची बाजू सावरताना दिसत आहेत.

हेही वाचा: Sanjay Raut News अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.