ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे घरगुती हिंसाचारात वाढ, मात्र  महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारीत घट - Women Commission

राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा यांच्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाकडे दिवसाला 70 तक्रारी या ई मेल, पोस्ट, किंवा प्रत्यक्ष येऊन दिल्या जात होत्या. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पीडित महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण घटले आहे.

lockdown
लॉकडाऊन
author img

By

Published : May 12, 2020, 1:09 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. भारतातील तिसऱ्या टप्प्यातील कालवधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या दरम्यान लॉकडाऊनमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. मात्र, घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांना दाद मागण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे पोहोचणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. कारण, लॉकडाऊन दरम्यान राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात आता र्यंत राज्यभरातून एकूण 107 तक्रारी या ईमेलच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागातून 12, अमरावती विभागातून 7, नाशिक 12, पुणे विभागातून 20, कोकण विभागातून 154, नागपूर विभागातून 4 तर मुंबईतून 24 घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या बरोबरच राज्य महिला आयोगाकडे 14 अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यात जिल्हा किंवा विभागाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा यांच्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाकडे दिवसाला 70 तक्रारी या ई मेल, पोस्ट, किंवा प्रत्यक्ष येऊन दिल्या जात होत्या. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पीडित महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण घटले आहे.

राज्य महिला आयोगाकडून घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर 1-1800-21-0980 हा क्रमांक सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत सूरु आहे. या बरोबरच मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही पीडित महिला आपली तक्रार नोंदवू शकतात. पीडित महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराचा न्यायनिवाडा करण्यासाठी सध्या राज्य महिला आयोग पोलीस व काही एनजीओच्या मदतीने सध्या लॉकडाऊन काळातही काम करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.