ETV Bharat / state

'कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकार व अन्य माध्यम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करा'

'जे पत्रकार, माध्यम कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले, त्यांचे कुटुंबीय आता वाऱ्यावर आहेत. त्या सर्वांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत जाहीर करावी', अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटलांनी केली आहे.

kapil patil
कपिल पाटील
author img

By

Published : Apr 3, 2021, 5:40 PM IST

मुंबई : 'कोरोनाने ७० पत्रकारांचा बळी घेतला आहे. पत्रकारांची भूमिका या काळात कोरोना योद्ध्यांपेक्षा वेगळी नाही. जोखीम पत्करून माध्यम कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात काम केले. अर्ध्या पगारावर किंवा बिनपगारी काम केले. जे पत्रकार, माध्यम कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले, त्यांचे कुटुंबीय आता वाऱ्यावर आहेत. त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्या सर्वांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत जाहीर करावी', अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

'पत्रकारांना तुटपुंजी सहानुभूतीदाखल मदत नाही'
एखाद्या मोठ्या अपघातात लोक मृत्युमुखी पडले तर त्यांच्या कुटुंबीयांना किमान ५ लाख रुपयांची मदत राज्य शासन तत्काळ जाहीर करते. ती मदत तातडीने पोहोचवलीही जाते. मात्र, पत्रकारांच्याबाबत असे काही घडत नाही. कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचा विमा राज्य शासनाने जाहीर केला आहे. मात्र पत्रकारांना वेतन संरक्षण नाही, पेन्शन नाही, सुरक्षा नाही. याबाबत विविध पत्रकार संघटनांनी शासन दरबारी निवेदने दिली आहेत, संघर्ष केला आहे. त्याची पुरेसी दखल सरकारकडून अजूनही घेतलेली दिसत नाही, असे कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

शासन व प्रशासनाला माध्यमांची मदत

कोरोनाकाळात पत्रकारांनी बजावलेली भूमिका केवळ प्रबोधनासाठी मर्यादित मानता कामा नये. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा ते भाग बनले आहेत. शासन व प्रशासनाला माध्यमांची मदत झाली आहे. हे लक्षात घेऊन या काळात कोरोनाने मृत्यू झालेले पत्रकार आणि अन्य माध्यम कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

हेही वाचा - पुण्यात आजपासून धार्मिक स्थळे बंद; दगडूशेठ गणपतीची 24 तास ऑनलाईन दर्शनाची सोय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.