ETV Bharat / state

Mumbai crime : सैफी रुग्णालयात बनावट इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू; पोलिसात गुन्हा दाखल

चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. रक्तातील तांबड्या पेशी कमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू ( Death by fake injection ) झाल्याने एफडीएच्या तक्रारीनंतर व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR in v p road police station mumbai )

saifee hospital
सैफी रुग्णालय
author img

By

Published : Jan 9, 2023, 1:54 PM IST

Updated : Jan 9, 2023, 2:01 PM IST

मुंबई : सैफी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू (Death by fake injection) झाल्याचे एफडीएच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून व्ही पी रोड पोलिसांनी मुंबईतील सैफी रुग्णालयातील मेडिकल सह ठाणे पुणे औरंगाबाद तसेच दिल्लीतील अकरा फार्मा सेंटर पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (FIR in v p road police station mumbai )

ओरोफर इंजेक्शन : या प्रकरणी बीपी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे त्यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. सैफी रुग्णालयात रक्तातील तांबड्या पेशींची कमी झाल्याने विवेक कांबळे यांच्यावरती उपचार सुरू होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना ओरोफर हे इंजेक्शन दिले. मात्र, इंजेक्शनचा दुष्परिणाम होऊन रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवायकांनी एफडीएकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत एफडीएने तातडीने रुग्णालयावर कारवाई केली. ही कारवाई 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आली. या कारवाईमध्ये एफडीएने रुग्णालयातील ओरोफर इंजेक्शनच्या साठ्याची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा साठा जप्त केला. त्याचप्रमाणे जप्त केलेले इंजेक्शनचे काही नमुने एफडीएने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले होते. ( Death of patient in saifee hospital )

पुरवठादारांविरोधात फसवणूक : तपासणीनंतर प्रयोगशाळेच्या अहवालात ते एफसीएम इंजेक्शन बॅच नंबर इ एल एफ 8 बीबी 2001 हे बनावट आणि अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एफडीएचे औषध निरीक्षक राजेश बनकर बीपी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधून सुरू झालेला इंजेक्शनचा तपास मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद तसेच दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्यानुसार या भागातील 11 मेडिकल्स आणि पुरवठादारांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( case registered for cheating )

पत्रकाचा वापर करून फसवणूक : पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या चाचणीनंतर आलेल्या अहवालात असे स्पष्ट झाले आहे की, बनावट लेबल, पत्रकाचा वापर करून फसवणूक केली आहे. त्यानंतर एफडीएने उचल घेत या प्रकरणी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांबड्या पेशींची कमतरता झाल्याने विवेक कांबळी या रुग्णावर उपचार सुरू असताना सैफी रुग्णालयात ( saifee hospital ) दिलेल्या ओरोफर या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी एफडीएकडे तक्रार केली तक्रारीची दखल घेत एफडीएने तातडीने रुग्णालयावर कारवाई केली आहे.

Last Updated : Jan 9, 2023, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.